निमगावात आंब्याची झाडे जोपासणाऱ्या ५३ महिलांचा पैठणी देऊन सन्मान
भरणे कुटुंबियांकडून वचनपूर्ती
निमगावात आंब्याची झाडे जोपासणाऱ्या ५३ महिलांचा पैठणी देऊन सन्मान
भरणे कुटुंबियांकडून वचनपूर्ती
इंदापूर : प्रतिनिधी
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ५३व्या वाढदिवसाच्या निम्मिताने गेल्यावर्षी ५३ महिलांना आंब्याची झाडे देण्यात आली होती. ती झाडे जोपासणाऱ्या महिलांना पुढील वर्षी पैठणी देण्याचा शब्द भरणे कुटुंबीयांकडून देण्यात आला होता. त्याची वचनपूर्ती करत बुधवारी (दि.१) ५३ महिलांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने गतवर्षी फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबचे सदस्य निसर्गप्रेमी ॲड. सचिन राऊत यांच्या माध्यमातून निमगाव केतकी येथील बारवकर वस्ती या ठिकाणी आयोजित कार्यक्रमावेळी महिलांना ५३ केशर जातीच्या आंब्याची झाडे देण्यात आली होती. याप्रसंगी बोलताना भरणे यांचे पुत्र श्रीराज भरणे यांनी झाडांचे संगोपन करणाऱ्या महिलांना पुढील वर्षी पैठणी देण्याचा शब्द दिला होता.तो शब्द पाळत भरणे कुटुंबियांकडून वचनपूर्ती करण्यात आली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे,तालुका वन परिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी,राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा छाया पडसळकर, संजय सोनवणे,निमगाव केतकीचे सरपंच प्रवीण डोंगरे,तात्यासाहेब वडापुरे,बाबासाहेब भोंग,लक्ष्मण हरणावळ, ॲड. समीरण पोळ,संदीप बारवकर उपस्थित होते.प्रास्ताविक ॲड. सचिन राऊत यांनी केले तर सूत्रसंचालन संजय म्हस्के यांनी केले. आभार माणिक भोंग यांनी मानले.
========================
गडहिंग्लज मध्ये डीवायएसपी म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी मला झाडे लावणारा डीवायएसपी म्हणून ओळखलं जायचं. ज्या ठिकाणी झाडे लावण्याचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी मला हमखास बोलवले जायचे, परंतु मी त्यांना देशी झाडे लावण्याबाबत कटाक्षाने सांगायचो. विदेशी झाडांपेक्षा कडुलिंब,वड, पिंपळ, उंबर अशी देशी झाडे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय मौलिक आहेत. त्यामुळे ती लावून त्यांचे संगोपन करावे. तसेच अशा प्रकारचे उपक्रम राबून पर्यावरण जनजागृती केली पाहिजे.
गणेश इंगळे,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती.