बारामती पोलीस ऍक्शन मोडमध्ये, दिलेल्या जागेवर गाडी पार्क करा अन्यथा होणार कारवाई
काही रस्ते एकेरी वाहतूक काही ठिकाणी सम विषम पार्किंग होणार आहे.
बारामती पोलीस ऍक्शन मोडमध्ये, दिलेल्या जागेवर गाडी पार्क करा अन्यथा होणार कारवाई
काही रस्ते एकेरी वाहतूक काही ठिकाणी सम विषम पार्किंग होणार आहे.
बारामती वार्तापत्र
बारामतीकरांनी आपली वाहने मंडई येथील सुसज्ज पार्किंग जागेत लावावी आपले शहर बदलत आहे दिवसेंदिवस शहरातील नागरी सुविधांच्या वर ताण येत आहे.
शहरांमध्ये वाहनांची संख्या वाढत आहे. असे बदल होत असताना आपण जर पारंपारिक पद्धतीने रस्त्यावर मार्केटच्या ,पेठामध्ये दुतर्फा वाहने लावली तर अपघाताची सुधा संख्या वाढत आहे. आणि शेवटी हा प्रश्न जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानी पर्यंत जात आहे.
बारामती शहरात येणाऱ्या लोकांना दुकानदारांना व्यापाऱ्यांना त्यांची मोटरसायकल व चार चाकी वाहने विनामूल्य सुरक्षित पार्क करण्यासाठी भाजी मंडई च्या वर पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर पार्किंग सुविधा नगरपालिका मार्फत विना मूल्य सुरू करण्यात आलेली आहे.
परंतु कोरोणा काळामध्ये सदर पार्किंगची सुविधा लोकांनी वापरली नाही आणि आता सर्व व्यवहार सुरळीत झालेली असताना वाहनांची रस्त्यावर गर्दी वाढली आहे.
तरी सर्व लोकांना विनंती करण्यात येते की मंडई येथील सुसज्ज दोन चाकी व चार चाकी वाहनांच्या पार्किंग चा वापर करावा त्याठिकाणी नगरपालिकेतर्फे दोन सुरक्षारक्षक सुद्धा नेमण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा याठिकाणी लावण्यात येणार आहेत त्यामुळे पेठेतून होणारी मोटर सायकल चोरी सुद्धा थांबणार आहे.
त्याच बरोबर तेली विहीर जवळ, पोलीस स्टेशन समोरील मारुती मंदिराच्या बाजूला, होमगार्ड बिल्डिंगच्या बाजूला. सिद्धेश्वर गल्ली या ठिकाणी सुद्धा वाहनांना पार्किंग व्यवस्था करून देण्यात आलेली आहे.
काही दिवसातच सुधारित वाहतूक आराखडा याला माननीय जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिलेली आहे त्याची सुद्धा अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यामुळे काही रस्ते एकेरी वाहतूक काही ठिकाणी सम विषम पार्किंग होणार आहे.
तरी सर्व लोकांनी दुकानासमोरच वाहने लावण्याची मानसिकता बदलून सुरक्षित ठिकाणी नेमून दिलेल्या पार्किंग व्यवस्थेत आपली वाहने पार्क करावी. त्यामुळे आपले वाहन सुरक्षित राहीलच शिवाय होणारे अपघात सुद्धा टाळणार आहेत.
आजपासून बारामती शहर पोलिसांनी सदर मंडई पार्किंग वर वाहने लोकांनी लावण्याबाबत कारवाई सुरू केली आहे त्याला सर्वांनी सहकार्य करावे.
पहिल्या मजल्यावर मोटर सायकल पार्किंग असेल व दुसऱ्या मजल्यावर कार पार्किंग असेल. यापुढे रस्त्यावर वाहने लावलेली दिसून आल्यास त्याच्यावर नो पार्किंग फाइन टाकला जाणार आहे.