जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता व वृक्षारोपण मोहिम
तरुण कलाकार – मिशनचे स्वयंसेवक ‘प्लास्टिक प्रदूषण’ या थीमवर पथनाट्य (नुक्कड-नाटिका) आयोजित करतील.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता व वृक्षारोपण मोहिम
तरुण कलाकार – मिशनचे स्वयंसेवक ‘प्लास्टिक प्रदूषण’ या थीमवर पथनाट्य (नुक्कड-नाटिका) आयोजित करतील.
बारामती वार्तापत्र
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने पाचगणी आणि महाबळेश्वर या पर्यटन ठिकाणी रविवारी (दि.५) व्यापक स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन संत निरंकारी मिशनच्या बारामती सह सातारा झोनमधील स्वयंसेवकांच्या मदतीने करण्यात येणार असल्याचे सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील पाचगणी आणि महाबळेश्वर उन्हाळ्यात पर्यटकांच्या प्रचंड गर्दीसाठी पर्यटन स्थळ म्हणून ओळखली जातात. मिशन मार्फत हा दिवस जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वी ग्रहाला भेडसावत असलेल्या पर्यावरणीय संकटाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.
प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण जग एकत्र येत आहे. या वर्षी, संत निरंकारी मिशनचे हजारो स्वयंसेवक त्यांच्या खाकी गणवेशात आणि SNCF स्वयंसेवक त्यांच्या निळ्या टी-शर्ट आणि कॅपमध्ये इतर भाविक आणि संबंधित शहरातील रहिवाशांसह स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळा, लोणावळा आणि पन्हाळा; ठिकाणी, स्वयंसेवक सकाळी आठ वाजता एकत्र येतील आणि दुपारी बारा वाजेपर्यंत मोहीम राबविण्यात येईल.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने होईल तरुण कलाकार – मिशनचे स्वयंसेवक ‘प्लास्टिक प्रदूषण’ या थीमवर पथनाट्य (नुक्कड-नाटिका) आयोजित करतील. स्वयंसेवक ‘प्लास्टिक वापरू नका, वायू प्रदूषण, स्वच्छता आणि वृक्षारोपण या संदेशावर जोर देण्यासाठी घोषणा असलेले फलक आणि बॅनर घेऊन जातील.
या कार्यक्रमात सहभागी ‘पृथ्वी प्रदूषणापासून वाचवू’ अशी शपथही घेतील. संत निरंकारी मिशन २०१४ पासून संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाद्वारे जागतिक पर्यावरण दिन पाळत असल्याचे श्री. झांबरे यांनी सांगितले.