स्थानिक
बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन
या प्रसंगी अनेक मान्यवर व फोरमचे सहकारी उपस्थित होते.
बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन
या प्रसंगी अनेक मान्यवर व फोरमचे सहकारी उपस्थित होते.
बारामती वार्तापत्र
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने रविवारी (ता. 5) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील तीन हत्ती चौक ते पेन्सिल चौक व पुन्हा शारदा प्रांगण असा या रॅलीचा मार्ग होता. या रॅलीमध्ये बारामतीतील विविध सायकल क्लबसह इंदापूर, भिगवण, श्रीपूर, फलटण या शहरातून सायकलस्वार या रॅलीत सहभागी झाले होते.
फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरिक्षक सुनील महाडीक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्या उपस्थितीत रॅलीला झेंडा दाखविला गेला. पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सायकलचा वापर वाढावा या उद्देशाने या सायकल रॅलीचे आयोजन केले गेले. दरवर्षी फोरमच्या वतीने सायकल रॅली आयोजित केली जाते. सुनील महाडीक व गणेश इंगळे हे दोघे अधिकारीही सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
या सायकल रॅलीमध्ये विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेकडो सायकलस्वार सहभागी झाले होते. या प्रसंगी अनेक मान्यवर व फोरमचे सहकारी उपस्थित होते.
बारामती- एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने रविवारी पर्यावरण दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीस झेंडा दाखविताना सुनेत्रा पवार व इतर मान्यवर.