दिखाऊ पेक्षा टिकाऊ वर भर देऊन यश मिळवा :पो.नि. सुनील महाडिक
नावासाठी नाही तर नाव मिळवून देण्यासाठी जय हो करिअर अकॅडमी कटिबद्ध
दिखाऊ पेक्षा टिकाऊ वर भर देऊन यश मिळवा :पो.नि. सुनील महाडिक
नावासाठी नाही तर नाव मिळवून देण्यासाठी जय हो करिअर अकॅडमी कटिबद्ध
बारामती वार्तापत्र
पोलीस मध्ये भरती झाल्यावर संयम, शिस्त बाळगा, गैर प्रकार करू नका, स्वतः शी स्पर्धा करीत, दिखाऊ पेक्षा टिकाऊ ला महत्व देत वर्दी मुळे सर्वत्र मान सन्मान मिळत असल्याने वर्दीचा सन्मान जीवनात कायम ठेवा असे मत बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी व्यक्त केले.
रविवार 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दीना निमीत्त जय हो करिअर अकॅडमी च्या वतीने पोलीस भरती मधील यशस्वी विद्यार्थीयांचा व पालकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या वेळी सुनील महाडिक मार्गदर्शन करीत होते या प्रसंगी गुन्हे अन्वेषण विभाग चे पोलीस शिपाई नंदू जाधव, विजय वाघमोडे, यशवंत पवार व प्रशांत कुचेकर आणि जय हो करिअर अकॅडमी चे संचालक संदीप जाधव आदी मान्यवर उपस्तित होते.
खाकी वर्दी सामान्य नाही, त्यास खूप अधिकार आहे त्याच प्रमाणे भरती साठी तयारी करताना सातत्य ठेवा, स्वतःची क्षमता ओळखा, झोकून देऊन अभ्यास करा व मोबाईल चा वापर अभ्यासासाठी तात्पुरता करा असेही सुनील महाडिक यांनी सांगितले
नावासाठी नाही तर नाव मिळवून देण्यासाठी जय हो करिअर अकॅडमी कटिबद्ध असून शारीरिक व बौद्धिक तयारी करून सामान्य घरातील तरुण तरुणींनी चे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पोलीस भरती साठी मार्गदर्शन करत असल्याचे जय हो चे संचालक संदीप जाधव यांनी सांगितले.
आबासो नाझीरकर, धनंजय बोराटे, राणी भगत, उमा करचे, प्रियांका घोगरे, पंकज मोरे, अक्षय बोरडकर आदी या वेळी भरती पूर्व अभ्यास व मैदान विषयावर मार्गदर्शन केले सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार दादू जाधव यांनी मानले