भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा कोरोनाबाधित
ट्विट करून ही माहिती दिली आहे.
भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा कोरोनाबाधित
ट्विट करून ही माहिती दिली आहे.
मुंबई : प्रतिनिधी
भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीसांनी स्वतः ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे. फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.
देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर जाणार होते. फडणवीस यांचा सोलापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. हा दौरा रद्द करण्यात आल्यामुळे फडणवीस मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यांना हा दौरा अचानक का रद्द केला. याची चर्चा होती. आज त्यांनी ट्विट करत कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले.
दरम्यान, माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सगळी औषधे घेत आहेत. ते सध्या घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
भाजपच्या चिंतेत वाढ झाली आहे. तरीही फडणवीस राजयसभेत मतदान करणार की नाही असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यावर चाचपणी करण्यासाठी भाजपने तातडीची बैठक बोलविली आहे.
राज्यात राज्यसभानिवडणूक होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी भाजपनं (BJP) पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक या तिघांना उमेदवारी दिली. शिवसेनेनं संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे सहाव्या जागेसाठी महाडिक आणि संजय पवार यांच्यात लढत होणार असल्याने एक-एक मत महत्वाचे आहे. या निवडणुकीत विजयासाठी 42 मतांची आवश्यकता आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाला आहे. तर फडणवीसांना कोरोना होणे भाजपला महागात पडण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत दोन वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. तर देवेंद्र फडणवीस दोन्ही बैठकांना ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. राज्य प्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह चंद्रकांत पाटील, आशिष शेलार तर गिरीश महाजन, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय दुसऱ्या बैठकीत हजर राहणार आहेत.
देवेंद्र फडणवीस मतदान करु शकणार की नाही, असे प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित राहिले आहेत. परंतु, राज्यसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांना अनेक पर्याय उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या नियमांनुसार देवेंद्र फडणवीसांना तीन दिवस आयसोलेशन पाळावे लागणार आहे. तिसऱ्या दिवशी कोविड रिपोर्ट निगेटीव्ह आला तरच त्यांना घराबाहेर पडता येणार आहे. तसेच, निगेटीव्ह रिपोर्ट येईपर्यंत फडणवीसांना घरातच राहावे लागणार आहे. फडणवीसांचा अहवाल निगेटीव्ह आला नाही तर पोस्ट मतदानावरही विचार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या प्रत्येक मतासाठी भाजप आणि महाविकास आघाडी स्पर्धा लागली असून उमेदवारांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदान करण्याची परवानगी मिळवी यासाठी न्यायालयात जाणार आहेत.