स्थानिक

बारामती नगरपरिषदेच्या इच्छुक नगरसेवकांची धाकधुक वाढली : त्या नगरसेवकांमुळे का?

निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे भंग करीत बारामतीत प्रभाग रचना

बारामती नगरपरिषदेच्या इच्छुक नगरसेवकांची धाकधुक वाढली : त्या नगरसेवकांमुळे का?

निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे भंग करीत बारामतीत प्रभाग रचना

बारामती विभाग 

अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचा 7 जून 2022 दिवस असताना 9 जून 2022 रोजी घेण्यात येणार असल्याचे पत्र राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव संजय सावंत यांनी तातडीने काढल्याने बारामती नगरपरिषदेच्या इच्छुक नगरसेवकांची आणखीन धाककुक वाढल्याचे दिसत आहे.

निवडणूक आयोगाच्या अवर सचिवांनी पत्रात ठोस कारण न देता कलम 10 नुसार अंतिम अधिसूचना शासन राजपत्रात तसेच स्थानिक वृत्तपत्रात, जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषदांच्या वेबसाईटवर इत्यादी ठिकाणी प्रसिद्ध करण्याकरीता निश्र्चित करण्यात आलेल्या दिनांकात अंशत: बदल करून 9 जून पर्यंत वेळ वाढून देण्यात येत आहे. असे स्पष्ट शब्दात नमूद केले आहे.

विरोधी पक्ष नेते सुनिल सस्ते यांनी प्रभाग रचना सुनावणी दरम्यान जिल्हाधिकारी यांना प्रभाग रचना नियम व अटींचा भंग केलेला आहे हे निदर्शनास आणून दिले होते. मात्र, त्यामध्ये नदीपात्र ओलांडले, झिगझॅग पद्धतीने नदीपात्र न दाखवण्याचा प्रयत्न केला, चतु:सिमा चुकविल्या आहेत.लोकशाही पद्धतीने सत्ताधारी काम करीत नसून मनमानेल त्याप्रमाणे काम सुरू असल्याचा आरोप सुद्धा सस्ते यांनी केला आहे.प्रत्यक्षात पाहणी न करता पवार समर्थक, झारीतील शुक्राचार्याने आराखडा जाहीर केला त्यावर अधिकार्‍यांनी सह्या करण्याचे काम केले आहे.

काही प्रभागांमध्ये अनुसूचित जाती जमातीना विभागण्याचा व त्यांच्या हक्कावर बाधा आणण्याचे काम केले आहे.

यामध्ये संपूर्ण समाजामध्ये या कृत्याचा द्वेष केला जात आहे. माळेगाव नगरपंचायतीमध्ये सुद्धा! या झारीतील शुक्राचार्याने ढवळाढवळ करून त्याठिकाणी सुद्धा प्रभाग रचना करून सर्वसामान्य लोकांचा रोष ओढवून घेतला असल्याचे येथील स्थानिक नागरीक बोलताना दिसत आहे.

सुनिल सस्ते गेली 4 ते 5 टर्म बहुसंख्य मताधिक्याने निवडून येत आहेत.

सुनिल सस्ते यांच्या कामाने नागरीक प्रभावीत होऊन त्यांना बहुसंख्य मताधिक्याने निवडून देत आहेत. नगरपरिषदेत सत्ताधारी अनाधिकृत कामांवर ते आजपर्यंत करडी नजर ठेवत आलेले आहेत. बारामती नगरपरिषदेत एका विरोधकामुळे प्रभाग रचना बदल करण्यामध्ये सत्ताधारी संपूर्ण शक्ती लावत असेल तर ही खूप सत्ताधार्‍यांची खेदाची बाब आहे. प्रभाग रचना करताना ओव्हर ब्रिज, रेल्वे क्रॉसिंग, नदी, नाले, कॅनॉल इ. ओलांडण्याचे नियम नसताना बारामती नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेत नियमबाह्य केल्याचा आरोप जिल्हाधिकारी यांच्यासमोर सस्ते यांनी केला असता, मुख्याधिकारी व प्रांतांची बोलती बंद झाली.

सुनिल सस्ते यांच्या समवेत प्रशांत उर्फ नाना सातव, विष्णुपंत चौधर हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!