क्राईम रिपोर्ट

निर्भिड निर्भया ने केला नामचीन गुंडावर बलात्काराचा गुन्हा दाखल

बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

निर्भिड निर्भया ने केला नामचीन गुंडावर बलात्काराचा गुन्हा दाखल

बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

क्राईम;बारामती वार्तापत्र

बारामती शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखा वरील नामचीन गुंड रोहित केशव जगताप (वय 28 वर्ष) राहणार कसबा,तालुका बारामती याने बारामती येथील एका निर्भया महिलेला तिच्या मुलाचे अपहरण करून मारून टाकण्याची धमकी देत तिला कोणी जवळचे नातेवाईक नाही हे पाहून व स्वतःची असणारी दहशत या जोरावर मोरगाव रोडच्या सिकंदर नगर भागात बोलावून त्याठिकाणी काटेरी झुडपांमध्ये तिच्यावर काल दुपारी बारा वाजता लैंगिक अत्याचार केला.

तेवढ्यावर त्याची शारीरिक भूक शमली नाही तर त्याने सदर निर्भया ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी जात परत त्या ठिकाणी गोंधळ करून त्यांची इच्छा पूर्ती करण्याची मागणी केली. सदरील महिलेने नकार दिला असता तिच्या घरी जाऊन तिच्या दरवाज्याची तोडफोड केली.

त्यामुळे सदरील महिलेने कोणतीही तमा न बाळगता पोलीस स्टेशन गाठून बलात्कार केल्याची हकिगत पोलिसांना सांगितली.महिलेचा जबाब तात्काळ नोंदवून रोहित केशव जगताप (वय 28) वर्षे कसबा याला पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत त्याच्यावर भादवि कलम 376, 427, 506, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक युवराज घोडके तसेच पोलीस हवालदार शिंदे इंगळे हे करत आहेत

यापुढे कोणत्याही महिलेची कोणाही व्यक्ती विरुद्ध लैंगिक अत्याचाराची अथवा अन्य तक्रार असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनची संपर्क करावा तात्काळ संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आवाहन बारामती पोलिसांनी केले आहे.

 

Related Articles

Back to top button