मुंबई

भारदस्त आवाज हरपला,35 वर्षाहून अधिक काळ वृत्तनिवेदन केलेले प्रदीप भिडे यांचं निधन

'आजच्या ठळक बातम्या' असे सांगणारा आवाज बंद झाला आहे.

भारदस्त आवाज हरपला,35 वर्षाहून अधिक काळ वृत्तनिवेदन केलेले प्रदीप भिडे यांचं निधन

‘आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा आवाज बंद झाला आहे.

मुंबई :प्रतिनिधी

भारदस्त आवाज, सुस्पष्ट उच्चार आणि प्रसन्न व्यक्तिमत्व लाभलेले, मुंबई दूरदर्शनवर सुमारे 35 वर्षाहून अधिक काळ वृत्तनिवेदन केलेले प्रदीप भिडे यांचं आज दीर्घ आजाराने राहत्या घरी निधन झालं.

रत्नाकरी मतकरी यांच्या आरण्यक, आता तरी शहाणे व्हा, अशा नाटकातून त्यांनी भूमिका केल्या. अनेक जाहीराती त्यांनी आपल्या भारदस्त आवाजाने लोकप्रिय केल्या.

ई मर्क आणि हिंदुस्थान लिवर या बहुराष्ट्रीय कंपन्यात प्रदीप भिडे यांनी जनसपर्क अधिकारी म्हणून काम केलं होतं. त्यानंतर ते मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये वृत्तनिवेदक म्हणून नोकरीला लागले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे.

राज्यात 1995 साली पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचं सरकार आल्यानंतर शिवाजी पार्कवर झालेला शपथविधी सोहळ्याचे त्यांनी सूत्रसंचालन केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी आणि  मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी आणि राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अनेक कार्यक्रमांचे त्यांनी सूत्रसंचालन केलं आहे.

Related Articles

Back to top button