विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय बारामती येथे व्होकेशनल कोर्सेस अभ्यासक्रम सुरु
विविध इंडस्ट्रीज मध्ये एक महिना ते तीन महिने दर सत्रामध्ये काम करावयास मिळणार आहे.

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय बारामती येथे व्होकेशनल कोर्सेस अभ्यासक्रम सुरु
विविध इंडस्ट्रीज मध्ये एक महिना ते तीन महिने दर सत्रामध्ये काम करावयास मिळणार आहे.
बारामती वार्तापत्र
शब्दांकन प्रा. पडूळकर डी. एम. (विभाग प्रमुख ए. आय. डी. एस. विभाग) pg. 1 व्होकेशनल कोर्सेस पारंपरिक वा अपारंपरिक शिक्षण पद्धतीत तांत्रिक शिक्षणाबरोबर कौशल्य विकासाची जोड मिळाली तरच उद्याच्या उन्नत भारत सशक्त भारत निर्माण अभियानाला बळकटी येऊ शकते याच हेतूने विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने व्होकेशनल पदवी/पदविका
अभ्यासक्रमाची नावीन्यपूर्ण बांधणी करून, देशातील विविध विद्यापीठे, स्वायत्त संस्था आणि संलग्न महाविद्यालये यांच्या माध्यमातून ह्या वैशिष्ट्य पूर्ण अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे योजले आहे.
आपल्या विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयास हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची संधी मिळाली याचा आम्हास आनंद वाटतो आहे. आपल्या महाविद्यालयात, क्लाऊड कॉम्पुटिंग आणि रोबोटिक्स अँड ऑटोमेशन या दोन विद्या शाखांना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून मान्यता प्राप्त झाली आहे. सदर अभ्यासक्रमांची रचना ही पारंपरिक, अपारंपरिक, तंत्रशिक्षण आणि कैशल्य विकास या चतु:सूत्रीवर आधारलेला आहे.
आपल्या महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या क्लाऊड कॉम्पुटिंग आणि रोबोटिक्स अँड ऑटोमेशन या विद्याशाखांमध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबर, विविध इंडस्ट्रीज मध्ये एक महिना ते तीन महिने दर सत्रामध्ये काम करावयास मिळणार आहे.
त्यामुळे विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच ईंडस्ट्रीजसाठी लागणारे कौशल्य विकसित होण्यास मदत होणार आहे, ही या कोर्सेची
सर्वात मोठी जमेची बाजू असणार आहे. जे विद्यार्थी काही कारणामुळे अभियांत्रिकीचा प्रवेश मिळवू शकले नाहीत त्या व जे विज्ञान शाखेव्यतिरिक्त आहेत त्या सर्व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. आता तंत्रशिक्षण व्होकेशनलच्या माध्यमातून घेण्यासाठी तुम्हाला विशिष्ट शाखेची गरज असणार नाही.
या पदवी उपक्रमाची वैशिष्ट्ये
१. प्रवेशित विद्यार्थी १२ वी पास कोणतीही विद्याशाखा( कला, वाणिज्य, विज्ञान) पात्र असेल
२. संबधित पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी ३ वर्षाचा असेल
३. सदर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, बॅचलर पदवीसाठी पात्र
४. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेस(upsc/mpsc) बसू इच्छितात ते पात्र असतील
५. पदवी परीक्षा पास झाल्याबरोबर राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय वा बहुराष्ट्रीय कंपनीत कामाची संधी
६. जे विद्यार्थी मिळवलेल्या कौशल्यावर आधारित व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांस
महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन व मदत योजना आता आपली विद्याशाखा आपल्या तंत्रशिक्षणासाठी अडथळा असू शकणार नाही, जर आपल्याकडे तंत्रशिक्षणसाठीची आवड आणि ती पूर्ण करण्याची उमेद असेल तर. …आजच आपला प्रवेश निश्चित करा.