महाविकास आघाडीचे चारही उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील : दत्तात्रय भरणे
प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला विश्वास
महाविकास आघाडीचे चारही उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील : दत्तात्रय भरणे
प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला विश्वास
इंदापूर : प्रतिनिधी
राज्यसभेच्या सहा जागांसाठी मत प्रक्रिया आज पार पडत आहे.सकाळी ९ वाजल्यापासून मतदान सुरू झाले असून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पहिला मताधिकार बजावला. प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री भरणे यांनी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील असा ठाम विश्वास व्यक्त केला.
गेली अनेक वर्षे बिनविरोध होणारी निवडणूक २४ वर्षांनंतर मतदानाद्वारे पार पडत आहे.सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरु होईल.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मताधिकार बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की,आज राज्यसभेसाठी मतदान होत असून मला पहिला मताधिकार करण्याचा मान मिळाला आहे.या निवडणुकीच्या निमित्ताने पहिलेच मत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळाल्याने खऱ्या अर्थानं पहिला कौल आमच्या बाजूने लागला असून आज दिवसभर महाविकास आघाडीचाच बोलबाला राहणार आहे.महाविकास आघाडीकडे उमेदवार जिंकून येण्यासाठी आवश्यक तेवढे संख्याबळ असल्यामुळे आमचे सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील.