विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय बारामती येथील माजी विद्यार्थी संघटना यांचे मार्फत मा. श्री. सोहम मांढरे यांचा जाहीर सत्कार.
अलौकिक यशामुळे त्याच्या घराण्याचे, गावाचे नाव मोठे झाले असे गौरव उदगार काढले.
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय बारामती येथील माजी विद्यार्थी संघटना यांचे मार्फत मा. श्री. सोहम मांढरे यांचा जाहीर सत्कार
अलौकिक यशामुळे त्याच्या घराण्याचे, गावाचे नाव मोठे झाले असे गौरव उदगार काढले.
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय बारामती येथील यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी विभागाचा सन २०१७ बॅचमधील माजी विद्यार्थी श्री. सोहम मांढरे याची केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२२ मध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये संपूर्ण देशातून २६७ क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला आहे.
यासाठी ०७ जून २०२२ रोजी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटना यांचे मार्फत त्याचा जाहीर सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी कु. रोहित गांधी यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य रा. स. बिचकर यांनी सोहम मांढरे व त्याचे वडील यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. प्राचार्यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात श्री. सोहम मांढरे यांचे विशेष कौतुक केले. तसेच सोहम मुळे आपल्या महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला आहे त्याचप्रमाणे त्याच्या या अलौकिक यशामुळे त्याच्या घराण्याचे, गावाचे नाव मोठे झाले असे गौरव उदगार काढले.
त्यानंतर डॉ. दि. भ. हंचाटे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोहम मांढरे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे व त्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्नामध्ये सातत्य, चिकाटी व कठोर परिश्रम घेतले कि यश आपोआप गवसणी घालते याची जाणीव करून दिली.
तसेच येथील विद्यार्थ्यांना ज्या ज्या वेळी माझी मदत लागेल त्या त्या वेळी मी तुम्हा सर्वांच्या मदतीसाठी तयार असेल असे आश्वासन दिले. तसेच माझ्या यशात माझ्या आई वडिला इतकाच या महाविद्यालयाचे शिक्षक यांचाही मोलाचा वाटा आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. श्री. पी. आर. चित्रगार यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. श्री. सुधीर लांडे, डॉ. अनिल हिवरेकर, डॉ. श्री. सचिन भोसले, श्री. विशाल कोरे हे उपस्थित होते. त्याच्या या निवडीबद्दल संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष श्री. अशोक प्रभुणे, सचिव निलीमाताई गुजर, खजिनदार श्री. युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, श्री, मंदार सिकची, श्री. किरण गुजर, रजिस्टार श्री. श्रीश कंभोज या सर्वांनी तिचे विशेष कौतुक केले व तिच्या पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.