सोमवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे बारामतीतील इच्छुकांच्या नजरा
कोणत्या इच्छुकांना धक्का बसणार ?
सोमवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे बारामतीतील इच्छुकांच्या नजरा
कोणत्या इच्छुकांना धक्का बसणार ?
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती (महिला),अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आता बारामती नगर परिषदेचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाला आहे.येत्या सोमवार दि.१३ जून २०२२ रोजी बारामती नगर परिषद इमारती मधील शरदचंद्र पवार सभागृहात हा आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न होणार आहे.
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या निवडणूक कार्यक्रमाकडे लक्ष लावून बसलेल्या इच्छुकांची धाकधूक आता चांगलीच वाढली आहे.प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे.मात्र आता होणाऱ्या आरक्षण सोडती नंतर कोणत्या इच्छुकांना दिलासा तर कोणत्या इच्छुकांना धक्का बसणार ? या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी आपल्याला सोमवार पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
दरम्यान,सोमवार दि.१३ जून रोजी सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ज्या कोणाला त्याच्यावर आक्षेप किंवा हरकत असेल तर ते बुधवार दि.१५ जून ते मंगळवार दि.२१ जून च्या दुपारी ३ वाजेपर्यंत मुख्याधिकारी यांचे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यलयाच्या मुख्यालयात सादर करू शकतील.
दरम्यान,बारामती नगरपरिषदेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिलासाठी आरक्षण निश्चिती करण्याकरिता सोडत चा कार्यक्रम इन केबलच्या चॅनल क्र. १३० वर सोमवार दिनांक१३ \६\२ ०२२ रोजी सकाळी ११ वाजता लाईव्ह दाखवण्यात येणार आहे.
टीप :- ज्या ग्राहकांना इन केबलचे लोकल चैनल १३० व १३१ दिसत नसेल त्यांनी आपल्या लोकल केबल ऑपरेटशी संपर्क साधावा हे चैनल फ्री आहेत.