स्थानिक

बारामती नगर परिषद निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर…पहा कोणत्या प्रभागात कोणतं आरक्षण ?

२० प्रभागातील एकूण ४१ जागांपैकी २१ जागा महिलांसाठी राखीव असतील.

बारामती नगर परिषद निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर…पहा कोणत्या प्रभागात कोणतं आरक्षण ?

२० प्रभागातील एकूण ४१ जागांपैकी २१ जागा महिलांसाठी राखीव असतील.

बारामती वार्तापत्र

बारामती नगर परिषद निवडणुकीची बहुप्रतीक्षित प्रभाग निहाय आरक्षण सोडत आज जाहीर झाली.प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,मुख्याधिकारी महेश रोकडे आणि सर्वपक्षीय राजकीय नेते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात पार पडला.

या सोडतीनंतर आता अनेकांनी प्रभाग निश्चित करुन नगरसेवकपदासाठी फिल्डींग लावण्यास प्रारंभ केला आहे. या आरक्षणानंतर कही खुषी कही गम असे वातावरण तयार झाले आहे. आज जाहीर झालेल्या 41 जागांपैकी तब्बल 21 जागांवर महिलांसाठी आरक्षण असल्यामुळे पुरुषांना 20 जागा मिळणार आहेत.

शासनाने धोरण बदलले असल्यामुळे नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे, त्यामुळे नगरसेवकांच्या मताला अधिक किंमत प्राप्त होणार आहे. एक ते 19 या प्रभागात दोन नगरसेवक तर शेवटच्या विसाव्या प्रभागात तीन नगरसेवक निवडून येतील.गेल्या अनेक दिवसांपासून अनेक इच्छुक या आरक्षणाची आतुरतेने वाट पाहत होते.

आज जाहीर झालेल्या आरक्षणा मध्ये 20 प्रभागातील 41 जागांसाठी आरक्षण घोषित करण्यात आले. प्रभाग निहाय आरक्षण पुढील प्रमाणे.

अ. क्र. प्रभाग क्रमांक जागा क्रमांक आरक्षण
१अ अनुसूचित जाती (महिला)
१ब सर्वसाधारण
२अ सर्वसाधारण (महिला)
२ब सर्वसाधारण
३अ सर्वसाधारण (महिला)
३ब सर्वसाधारण
४अ सर्वसाधारण (महिला)
४ब सर्वसाधारण
५अ सर्वसाधारण (महिला)
१० ५ब सर्वसाधारण
११ ६अ सर्वसाधारण (महिला)
१२ ६ब सर्वसाधारण
१३ ७अ सर्वसाधारण (महिला)
१४ ७ब सर्वसाधारण
१५ ८अ सर्वसाधारण (महिला)
१६ ८ब सर्वसाधारण
१७ ९अ सर्वसाधारण (महिला)
१८ ९ब सर्वसाधारण
१९ १० १०अ सर्वसाधारण (महिला)
२० १०ब सर्वसाधारण
२१ ११ ११अ सर्वसाधारण (महिला)
२२ ११ब सर्वसाधारण
२३ १२ १२अ अनुसूचित जाती (महिला)
२४ १२ब सर्वसाधारण
२५ १३ १३अ अनुसूचित जाती (महिला)
२६ १३ब सर्वसाधारण
२७ १४ १४अ अनुसूचित जाती
२८ १४ब सर्वसाधारण (महिला)
२९ १५ १५अ सर्वसाधारण (महिला)
३० १५ब सर्वसाधारण
३१ १६ १६अ अनुसूचित जाती
३२ १६ ब सर्वसाधारण (महिला)
३३ १७ १७अ सर्वसाधारण (महिला)
३४ १७ब सर्वसाधारण
३५ १८ १८अ अनुसूचित जाती
३६ १८ब सर्वसाधारण (महिला)
३७ १९ १९अ अनुसूचित जाती (महिला)
३८ १९ब सर्वसाधारण
३९ २० २०अ अनुसूचित जाती
४० २०ब सर्वसाधारण (महिला)
४१ २०क सर्वसाधारण (महिला)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram