पिंपळीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती जल्लोषात साजरी
रक्तदान शिबिरात ७७ रक्त बॅग संकलित झाल्या.
पिंपळीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती जल्लोषात साजरी
रक्तदान शिबिरात ७७ रक्त बॅग संकलित झाल्या.
बारामती वार्तापत्र
पिंपळी-लिमटेक येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने पिंपळी गावामध्ये २९७ वी जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. या सामाजिक उपक्रमांमध्ये रक्तदान शिबिर,वृक्ष वाटप व शालेय साहित्यांचे वाटप बारामती ॲग्रो चे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.रक्तदान शिबिरात ७७ रक्त बॅग संकलित झाल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना युवकांनी हाती घेतलेल्या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
रक्तदान शिबिर, वृक्ष वाटप व शालेय साहित्य वाटप असे उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून सर्व युवक वर्गाच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या.
असेच सामाजिक उपक्रम राबवित असताना सर्वांनी एकत्रित येऊन वृक्ष लागवड सारखे उपक्रम गावातील मुख्य रस्ते व सर्व सार्वजनिक रस्त्याच्या कडेने वृक्ष लागवड करून तसेच प्रत्येक घराप्रमाणे एक फळ झाड किंवा ऑक्सिजन देणारे एक झाड लावून आपले गाव सुजलाम सुफलाम करावे आणि गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात यावे जेणेकरून ते शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, असे त्यांनी मनोगत व्यक्त करुन अहिल्यादेवी जयंती निमित्त अभिवादन करून सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
कमिटीचे प्रमुख पदाधिकारी अध्यक्ष संतोष केसकर,उपाध्यक्ष रणजित देवकाते पाटील,खजिनदार सुरज बनकर, सदस्य नवनाथ देवकाते, विशाल मेरगळ, नितिन देवकाते, सुनिल केसकर, सोनू चोरमले, दिपक देवकाते, प्रफुल्ल देवकाते, रोहन तांबे, अतुल गावडे, राजेंद्र केसकर,विशाल ठेंगल, ज्योतिबा सोलनकर तसेच पिंपळी-लिमटेक गावातील प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कमिटीच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले.