सी.सी.टी.व्ही.मदतीने बारामती शहर पोलिसांनी शोधून काढला अपघात करणारा टँकर
बळी पडलेल्या महिलेला न्याय देऊ शकलो याबाबत पोलिसांना समाधान आहे
सी.सी.टी.व्ही.मदतीने बारामती शहर पोलिसांनी शोधून काढला अपघात करणारा टँकर
बळी पडलेल्या महिलेला न्याय देऊ शकलो याबाबत पोलिसांना समाधान आहे
क्राईम;बारामती वार्तापत्र
दिनांक 25 मे रोजी सायंकाळी राष्ट्रवादी भवन समोर फलटण रोडवर भरधाव जाणाऱ्या टँकरने एका जोडप्याला धडक मारून त्यामध्ये मोटरसायकल वरील महिला सदर टँकरच्या पाठीमागील चाकाखाली येऊन जागीच मयत झाली होती सदरची घटना सीसीटीव्हीमध्ये दिसत होती सदरचा टँकर चालक त्या ठिकाणावरुन टँकर सह पळून गेलेला होता पोलिसांनी भिगवण इंदापूर पुणे जेजुरी नीरा पर्यंत सर्व रोडच्या फुटेज तपासल्या होत्या टँकर जेजुरी पर्यंत गेल्याचे दिसत होते परंतु नंबर कुठल्याही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत नव्हता.
यातील पीडित महिलेचे नातेवाईकांना सुद्धा याबाबत फोटोग्राफ दिले होते. सदरचा टँकर जेजुरीमध्ये असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील व स्टाफ यांना पाठवण्यात आले सदर टँकर चा कलर व सीसीटीव्ही फुटेज मधील टॅंकरचा कलर यामध्ये साम्य मिळाले या टँकर चालक सुभाष बलभीम शिरसाठ age 50 राहणार गितेवाडी दहिगाव तालुका आष्टी जिल्हा बीड यांच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने 25 तारखेला अपघात केल्याचे कबूल केले.
सदर इसम व टॅंकर ला बारामती शहर पोलीस ठाणे येथे घेऊन आलो व सदर चालकावर गुन्हा दाखल केलेला असल्याने त्याला त्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेली आहे सदरचा टँकर ताब्यात घेण्यात आलेला आहे.
यातील बळी पडलेल्या महिलेला न्याय देऊ शकलो याबाबत पोलिसांना समाधान आहे कोणताही अपघाताचा गुन्हा उघड होण्याचे राहू नये व पीडित चे किंवा बली पडलेले व्यक्तीचे नातेवाईकांना कायदेशीर मार्गाने मोटर दावा प्राधिकरण कडून आर्थिक मदत व्हावी याबाबत माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांचे सक्त आदेश आहेत त्यामुळे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश पाटील पोलीस नाईक इंगवले कोठे पोलीस हवालदार शिंदे यांनी या बाबत सतत सीसीटीवी फुटेज चेक करून गुन्हा उघड करण्यास प्रयत्न केले आहेत.