इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई ; गुटख्यासह ४९ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
वाहन चालकास घेतले ताब्यात
इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई ; गुटख्यासह ४९ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
वाहन चालकास घेतले ताब्यात
इंदापूर : प्रतिनिधी
पुणे सोलापूर महामार्गांवर लोणी देवकर हद्दीत पहाटेच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान अवैद्य गुटख्याने भरलेला ट्रक इंदापूर पोलिसांनी पकडला असून या कारवाईत गुटख्यासह ४९ लाख ७५ हजारांचा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पहाटेच्या सुमारास गस्त घालत असताना सोलापूर बाजूकडून पुण्याच्या दिशेने जात असणारा ट्रक (के.ए ५६, ५५८८) संशयास्पद वाटल्याने इंदापूर लोणी देवकर हद्दीत थांबवून चौकशी केली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी जीवनास अपायकारक असणारा ५० बॉक्स गुटखा मिळून आला. त्यानुसार २४ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा गुटखा व २५ लाख रुपयांचा वाहतूक करणारा ट्रक असा एकूण ४९ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.त्यानुसार गाडी चालक व मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम इंदापूर पोलीस ठाण्यात सुरू आहे.
सदरील कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, पोलीस नाईक मोहम्मद अली मड्डी, पो. ना सलमान खान, पो. ना. मोहिते, पो. ना जगन्नाथ कळसाईत, पो कॉ. विशाल चौधर आदींनी केली आहे.
सदरील अवैद्य गुटख्यावरील कारवाई ही मागील तीन महिन्यात झालेल्या कारवाईत सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर यांनी सांगितले.