राज्यात करोनाच्या जीवघेण्या संसर्गाने पुन्हा वाढतोय!
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. अशात
राज्यात करोनाच्या जीवघेण्या संसर्गाने पुन्हा वाढतोय!
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. अशात
मुंबई, प्रतिनिधी
राज्यात करोनाचा धोका वाढत असताना मुंबईत मात्र रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. अशात ठाण्यातील करोनाचा आकडाही पुन्हा झपाट्याने वाढताना समोर आला आहे. गुरुवारी ठाण्यात करोनाचा आकडा ९३४ वर गेला असून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ३५८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ठाणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
आरोग्य विभागाने सांगितले की, महानगरपालिका संचालित कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेच्या अहवालात महानगरातील तीन रुग्णांमध्ये BA.4 सब व्हेरियंट आणि एका रुग्णामध्ये BA.5 व्हेरियंट असल्याची पुष्टी झाली आहे. या चार रुग्णांमध्ये दोन मुली आणि दोन पुरुष आहेत. मुलींचे वय 11 वर्षे आणि पुरुषांचे वय 40 ते 60 वर्षे आहे. विभागाने सांगितले की, सर्व रुग्णांनी होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण केला आहे आणि ते आजारातून बरे झाले आहेत.
तर राज्यात आजपर्यंत एकूण ७७,५५,१८३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आज ३ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्के एवढा आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८७ टक्के एवढे झाले आहे.
का वाढतोय करोना?
बीएमसी आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, रुग्णांची संख्या वाढत असली तरी गंभीर रुग्णांची संख्या तशी कमी आहे. अशात मुंबईत मान्सून दाखल झाला, त्यामुळे नागरिकांनी मोसमी आजारांपासून सावध राहण्याची गरज आहे. सध्या सर्दी, खोकला आणि तापाची साथ असल्यामुळे लोक वेगाने आजारी पडत आहेय. अशात निर्बंध उठवल्याने लोक मास्क न वापरताच रस्त्यांवर फिरताना दिसतात. त्यामुळे कडक लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे.