इंदापुर मध्ये तीन गुन्ह्यातील आरोपी गजाआड
पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक
इंदापुर मध्ये तीन गुन्ह्यातील आरोपी गजाआड
पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दमदार कामगिरी करत सोशल मीडियावर तलवारीसह फोटो ठेवून दहशत माजवणाऱ्या, शहरात सोन्याच्या दुकानात झालेल्या चोराला, तसेच तहसीलदार हल्ला प्रकरणातील आरोपी अशा तिघांना इंदापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
याबाबत इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आचार संहिता लागू झाल्यानंतर पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले असून त्यानुसार गुन्हे शोध पथकाला सूचना केल्यानंतर पळसदेव येथील एकाने हातात तलवार घेऊन सोशल मीडियावर फोटो व्हायरल करत दहशत माजवल्याप्रकरणी निखिल उर्फ लाला गणपत शिंदे (रा. पळसदेव) यास सापळा रचून पकडून त्याच्याकडून तलवार हस्तगत करीत गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसऱ्या प्रकरणात इंदापूर शहरातील राजे ज्वेलर्स येथे मंगळवार (ता.15) रोजी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने हातचलाकी करून तेथेच दोन वेळा सोने चोरी करणाऱ्या सराईत चोरटा विठ्ठल रामचंद्र सानप (रा. संभाजीनगर) यास चपळाईने ताब्यात घेत अटक करून त्याच्याकडून सोन्याचे अंगठी, डोरले असा एकूण 36 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
तर तिसऱ्या प्रकरणात इंदापूरचे तत्कालीन श्रीकांत पाटील त्यांच्या हल्ला प्रकरणातील अद्यापही फरार असलेला आरोपी पांडुरंग बाबुराव देवकर (रा.बेडसिंग,ता. इंदापूर) यालाही अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.
इंदापूर गुन्हे शोध पथकाने सदरची कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड, इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माने, पोलीस हवालदार सलमान खान, गणेश डेरे ,विशाल चौधर, तुषार चव्हाण, अंकुश माने, नंदू जाधव, प्रवीण शिंगाडे यांनी केली आहे.