विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न
एकूण १४८ रक्ताच्या बाटल्याचे संकलन
विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न
एकूण १४८ रक्ताच्या बाटल्याचे संकलन
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तसेच वसंतराव पवार विधी महाविद्यालय, स्कुल ऑफ आर्किटेक्चर बारामती व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या दरम्यान रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
शिबिराचे उदघाटन प्राचार्य डॉ. अतुल शहाणे यांच्या शुभहस्ते तसेच प्राचार्य डॉ. राजनकुमार बिचकर, प्राचार्या आर्कि. राजश्री पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपटावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल शहाणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून रक्तदानाचे महत्व व त्याची समाजासाठी असणारी गरज पटवून दिली.
तसेच या स्तुत्य उपक्रमामध्ये जास्तीत विद्यार्थ्यांना, युवकांना सहभागी करून घ्यावे व महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. रक्तदान हे अत्यंत सर्वश्रेष्ठ दान आहे, त्याचबरोबर नेत्रदान देखील महत्त्वाचे आहे.
प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मृत्यू पश्चात नेत्रदान करण्यासाठी फॉर्म भरला पाहिजे. आपल्या मृत्यू पश्चात आपल्या डोळ्यांमुळे इतरांना दृष्टी मिळत असेल तर ते एक महान कार्य आहे. एका व्यक्तीचे दोन डोळे हे त्या मृत व्यक्तीच्या नेत्रपटलाच्या विविध उपयोगामुळे समाजातील सहा लोकांना दृष्टी देऊ शकतात असे मौलिक विचार त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून मांडले.
या शिबिरामध्ये विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या शिबिरामध्ये एकूण १४८ रक्ताच्या बाटल्याचे संकलन करण्यात आले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा. दीपक सोनवणे, प्रा. विकास बनसोडे, प्रा. अशोक भुंजे, डॉ. बिपिन पाटील तसेच विद्यार्थी प्रणव मदने, अजित जहागिरदार, रोहन निंबाळकर, यश चव्हाण, अभिनव धाकपाडे व संस्कार मदने, त्यांचे सर्व विद्यार्थी सहकारी मित्र त्याचप्रमाणे अक्षय रक्त पेढी व सौ. अनिता जाधव यांनी विशेष सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे शैक्षणिक अधिष्ठता डॉ. सचिन भोसले, डॉ. अनिल हिवरेकर, प्राचार्य डॉ. राजन कुमार बिचकर आदी आवर्जून उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. राजनकुमा बिचकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.