राष्ट्रीय जलतरण स्पर्धामध्ये वरदा कुलकर्णी ची नेत्रदीपक कामगिरी
राष्ट्रीय जलतरण स्पर्धामध्ये वरदा कुलकर्णी ची नेत्रदीपक कामगिरी
राज्यातील जवळ जवळ ५००पेक्षा जास्त दिव्यांग यात सहभाग
बारामती वार्तापत्र
वीर सावरकर जलतरण तलाव, बारामती येथील पॅरा खेळाडू कुमारी वरदा संतोष कुलकर्णी व सारंग प्रवीण सूर्यवंशी या स्विमर्स नी पणजी येथे झालेल्या प्यारा ऑलंपिक स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली .
पॅरा ऑलंपिक कमिटी ऑफ इंडिया आणि गोवा पॅरा ओलंपिक असोसिएशन यांच्यामार्फत राष्ट्रीय जलतरण स्पर्धा कँपाल, गोवा येथे 20 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या दरम्यान पार पडल्या यामध्ये कुमारी वरदा कुलकर्णी हिने ज्युनिअर मुली गटात १०० मीटर फ्री स्टाईल मध्ये प्रथम क्रमांक पटकावला व गोल्ड मेडल वर आपले नाव कोरले.
तसेच कु. सारंग प्रविण सूर्यवंशी यांनी 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये सुवर्णपदक पटकावले ,100 मीटर फ्री स्टाईल मध्ये रौप्य ,50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये रौप्य पदक जिंकले. भारतातील अनेक राज्यातील जवळ जवळ ५००पेक्षा जास्त दिव्यांग यात सहभाग घेतला होता. वरदा कुलकर्णी ही आयर्न मॅन ओम सावळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
या विद्यार्थ्यांच्या यशा बद्दल जलतरण तलावाचे अध्यक्ष डॉक्टर तांबे , सचिव विश्वास शेळके , खजिनदार मिलिंद अत्रे व सर्व विश्वस्त मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.