पोदार प्रीस्कूलमध्ये चिमुकल्यांचा ‘दिवाळी मेळा ’ उत्साहात संपन्न
कुटुंबासह विविध कृतीयुक्त उपक्रम
पोदार प्रीस्कूलमध्ये चिमुकल्यांचा ‘दिवाळी मेळा ’ उत्साहात संपन्न
कुटुंबासह विविध कृतीयुक्त उपक्रम
बारामती वार्तापत्र
बारामती येथील पोदार पूर्व प्राथमिक शाळेमध्ये २६ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांचा ‘ दिवाळी मेळा ’ उत्साहात संपन्न झाला.
पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांमध्ये परंपरांबद्दल प्रेम , सामुदायिक सहकार्य , सर्जनशीलता व सांस्कृतिक जागरूकता विकसित करण्याच्या उद्देशाने ‘ दिवाळी मेळा – चला आनंदाचा प्रकाश पसरवूया ’ हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामधून मुलांना कुटुंबासह विविध कृतीयुक्त उपक्रमातून व दिवाळी सणाच्या मौजमजेतून जीवन मूल्ये आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
रंगीत कागदाच्या तुकड्यापासून रांगोळी काढणे , घरातील स्वच्छतेचे महत्त्व , आकर्षक आकाशकंदील , दिव्यांची सजावट इत्यादी उपक्रमातून विद्यार्थी व पालकांसाठी दिवाळी सण आनंददायी व अविस्मरणीय बनवण्यात आला.
शाळेचे प्राचार्य तुषार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सरिता परकाळे यांनी मुलांना दिवाळी सणांच्या परंपरेची व जीवन मूल्यांची सखोल माहिती देऊन दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन शालेय प्रशासकीय प्रमुख शेखर तुपे यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.