गड किल्ल्याचे संवर्धन व जतन होणे काळाची गरज: अभिषेक ढवाण
किल्ल्यांवर प्रदूषण व धूम्रपान करू नका
गड किल्ल्याचे संवर्धन व जतन होणे काळाची गरज: अभिषेक ढवाण
किल्ल्यांवर प्रदूषण व धूम्रपान करू नका
बारामती वार्तापत्र
पुढील पिढीसाठी किल्ले व गडकोट यांचे जतन आणि संवर्धन होणे ही काळाची गरज आहे अन्यथा फक्त चित्रात दाखविले जाईल त्यासाठी म्हतपूर्ण ठेवा चे संरक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध आहार तज्ञ अभिषेक ढवाण यांनी केले.
‘पूर्वीचे किल्ले त्यांचे वैभव व आताची त्या किल्ल्यावरील परिस्थिती ‘ या विषयावर मार्गदर्शन अभिषेक ढवाण यांनी केले.
माझा किल्ला माझा स्वाभिमान संस्थेच्या वतीने आयोजित गड किल्ले संवर्धन या विषयावर अभिषेक ढवाण मार्गदर्शन करीत होते. या प्रसंगी माझा किल्ला माझा स्वाभिमान संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सद्याची युवा पिढी गड किल्ले चढतात परंतु त्या ठिकाणी प्लास्टिक होऊ नये म्हणून काळजी घ्यावी गड किल्ले हे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आत्ता जे किल्ले पाहतो ते गड वा त्यातील वास्तूंचे अवशेष आहेत. पण ज्यावेळेस ते बांधले गेले त्यावेळी ती एक डौलदार वास्तू असेल
या वेळी दरबार, बाजार, मंदिर, नागमोडी वळण असणारा महा दरवाजा, तबेला, इत्यादी असे वास्तू होत्या आज त्या काही ठिकाणी बघणं अवस्थेत आहेत तर काही ठिकाणी पूर्णपणे तुटलेले आहेत.
जर सुखरूप असते तर ते कसे दिसले असते याची काल्पनिक प्रतिकृती त्यांनी दाखविल्या
केवळ दिवाळी पुरते गड किल्ले विद्यार्थ्यांना दाखवू नका त्या ठिकाणी सहल घडवा व शासनाच्या मदती पेक्षा स्वतः पुढे व्हा संघटित होऊन मदत करा, त्या पवित्र ठिकाणी प्रदूषण करू नका, धूम्रपान करू नका असेही अभिषेक ढवाण यांनी सांगितले.
फोटो ओळ:
किल्ला व त्यातील वास्तू याची संकल्पना करून दिवाळी निमित्त बनवलेला किल्ला.