पवार कुटुंबियांमध्ये दिवाळी पाडव्यातील फूट.अजित पवार स्पष्टच बोलले
अनेक लाडक्या बहिणी भेटण्यासाठी
पवार कुटुंबियांमध्ये दिवाळी पाडव्यातील फूट.अजित पवार स्पष्टच बोलले
अनेक लाडक्या बहिणी भेटण्यासाठी
बारामती वार्तापत्र
बारामतीमध्ये पहिल्यांदाच दोन ठिकाणी पाडवा साजरा झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोविंद बागेत पाडवा साजरा केला. तर अजित पवार यांनी काटेवाडीमध्ये पाडवा साजरा केला.
यापूर्वी दिवाळी पाडव्याला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत होतं. मात्र राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजही पवार कुटुंब एकत्र येणार का? उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र यावेळी अजित पवार यांनी काटेवाडीमध्ये तर शरद पवार यांनी गोविंद बागेत पाडवा साजरा केला. यावेळी दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याची भेट घेण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं.आता यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
आज काटेवाडीमध्ये पाडवा साजरा केला. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भेटण्यासाठी आले होते. त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आज अनेक लाडक्या बहिणी भेटण्यासाठी आल्या. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनी भेट घेतली. माझे जे जुने पत्रकार मित्र आहे, त्यांना आठवत असेल पूर्वी काटेवाडीमध्येच पाडवा साजरा व्होत होता. पाडव्याच्या दिवशी काटेवाडीमध्ये कार्यकर्ते साहेबांना भेटण्यासाठी येत होते. त्यानंतर पुढे गोविंद बागेची जागा घेतली. बारामतीमधील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी सोप आणि सोईचं पडतं म्हणून त्यानंतर पाडवा हा गोविंद बागेतच साजरा व्हायला लागला. आजही भेटणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी खूप होती. लोकांनाही घरी जायची घाई असते, सण साजरा करायचा असतो. त्यामुळे गर्दी विभागली जावी, कार्यकर्त्यांना लवकर घरी जाता यावं म्हणून मी गोविंद बागेत गेलो नाही. काटेवाडीतच पाडवा साजरा केला. ज्या कार्यकर्त्यांना साहेबांना भेटायचं होतं ते त्यांना भेटले. ज्यांना मला भेटायचं होतं ते मला भेटले त्यामुळे गर्दी विभागली गेली अशी प्रतिक्रिया यावेळी अजित पवार यांनी दिली आहे.
दरम्यान पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच दोन ठिकाणी पाडवा साजरा झाला.यावर शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या पूर्वी संपूर्ण कुटुंब गोविंद बागेत पाडवा साजरा करायचं मात्र आता तो दोन ठिकाणी करण्यात आला, यामुळे आपण अस्वस्थ आहोत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की अजित पवार यांना कदाचित वेळ मिळाला नसेल म्हणून ते भेटायला आले नसतील.
अजितदादांची मेळाव्याला दांडी, शरद पवार यांचा सणसणीत टोला
दरवर्षी आम्ही गोविंदबागेत पाडवा साजरा करतो. वर्षानुवर्षे दिवाळी पाडवा साजरा करण्याची आमची परंपरा आहे. यंदा बारामतीत आलेल्या काही लोकांना दोन्ही ठिकाणी जावे लागले. त्यांना त्रास झाला म्हणून मी अस्वस्थ आहे. तिकडच्या पाडव्यात मला काही वेगळेपण दिसले नाही. पाडव्याच्या आदल्या दिवशी आम्ही सारे एकत्र जमतो. पण अजित पवार यांना कामातून वेळ मिळाला नसेल म्हणून कदाचित आले नसतील, असा सणसणीत टोला शरद पवार यांनी लगावला.