धक्कादायक, इंदापूर मध्ये कोरोनामुळे दूसरा मृत्यु.. शहरातील जेष्ठ वृध्दाचा मृत्यु…
काल रात्री 10:30 ला पुण्यात उपचारादरम्यांन झाला मृत्यु...
धक्कादायक, इंदापूर मध्ये कोरोनामुळे दूसरा मृत्यु..
शहरातील जेष्ठ वृध्दाचा मृत्यु…
काल रात्री 10:30 ला पुण्यात उपचारादरम्यांन झाला मृत्यु…
इंदापूर शहराततील कोरोनाचा पाहिला रुग्ण असलेल्या ज्येष्ठ वृद्धाचा (वय ७८) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे…
पाच जून रोजी त्यांना कोरोना असल्याने इंदापूर शहरात एकच खळबळ उडाली होती, कारण इंदापूर शहरातील हा कोरोनाचा पहिला रुग्ण होता, लॉकडाऊन च्या काळात ते सोलापूर येथे वास्तव्यास होते मात्र त्यांना त्रास होत असल्याने ते एक जूनला इंदापूरला आले होते व दुसऱ्या दिवशी त्यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू करण्यात आले, त्यावेळी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती, मात्र पाच जूनला पुन्हा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला , त्यांच्या संपर्कातील सर्वांचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आल्याने शहरात काहीसा प्रमाणात दिलासा होता..
महसूल विभागात त्यांनी काम केलेले असून वीस वर्षांपूर्वी ते निवृत्त झालेले होते, त्यांना इतरही आजार होते. काल रात्री साडेदहा वाजता त्यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला असल्याची माहिती इंदापूर च्या तहसीलदार सोनाली मेटकारी यानी दिली, इंदापूर तालुक्यातील हा कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे.. तालुक्यात सध्या कोरोना चे एकूण आठ रुग्ण झालेले आहेत, यातील चार जण ठणठणीत बरे होऊन घरी पाठवलेले आहेत, तर दोघां वरती उपचार सुरू असून दोघांचा मृत्यू झालेला आहे…