अखेर शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत! म्हणाले, “आता कुठेतरी थांबलं पाहिजे”
दीड वर्षानंतर पुन्हा राज्यसभेत जायचं की, नाही याचा विचार मला करावा लागेल.
अखेर शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत! म्हणाले, “आता कुठेतरी थांबलं पाहिजे”
दीड वर्षानंतर पुन्हा राज्यसभेत जायचं की, नाही याचा विचार मला करावा लागेल.
बारामती वार्तापत्र
बारामती विधानसेभेचे शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी सभा घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अशाच एका सभेत आता कुठेतरी थांबलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत.
शरद पवार म्हणाले की, “मी सत्तेत नाही, राज्यसभेत आहे आणि अजून माझं दीड वर्ष आहे. या दीड वर्षानंतर पुन्हा राज्यसभेत जायचं की, नाही याचा विचार मला करावा लागेल. मी लोकसभा लढणार नाही. कसलीच निवडणूक लढणार नाही.
अहो किती निवडणूका करायच्या? आतापर्यंत १४ निवडणूका केल्यात. तुम्ही असे लोक आहात की, एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडूनच देताय. त्यामुळे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. नवी पीढी आणली पाहिजे, हे सुचवून मी कामाला लागलो आहे,” असे ते म्हणाले.