होमग्राऊंड बारामती हेलिपॅड वर शरद पवार यांच्या बॅगांची तपासणी
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे.
होमग्राऊंड बारामती हेलिपॅड वर शरद पवार यांच्या बॅगांची तपासणी
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे.
खासदार शरद पवार हे शनिवारचा बारामतीचा मुक्काम आटोपून रविवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे प्रचार सभेसाठी जात असताना निवडणूक आयोगाच्या पथकाकडून बारामती हेलिपॅड वर त्यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची तपासणी करण्यात आली.
काल रायगडमध्येही शरद पवार यांच्या बॅगा तपासण्यात आल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. लोकसभेला शरद पवार यांना अपेक्षित यश मिळाले होते. आता विधानसभेलाही शरद पवार यांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. प्रचारासाठी त्यांनी राज्यभर दौरे केले, खासकरुन साथ सोडणाऱ्या मंत्र्यांविरोधात त्यांनी रणशिंग फुंकले. बारामतीमध्येही त्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. अजित पवार यांच्याविरोधात नातू युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवलेय. आज आणि उद्या शरद पवार बारामतीमध्ये प्रचार करणार आहेत. पुतण्याविरोधात शरद पवार यांनी ताकद पणाला लावली आहे.
लोकसभेला बारामतीकरांनी शरद पवारांना साथ दिली. पण आता विधानसभेला अजित पवार यांच्यासारखं तगडं आव्हान समोर आहे. शरद पवार यांनी तशीच तयारीही केल्याचे दिसतेय. शरद पवार यांनी अजित पवार यांच्याच पुतण्याला मैदानात उभं केलं. युगेंद्र पवार यांनी लोकसभेला सुप्रिया सुळे यांचा प्रखर प्रचार केला होता. आता युगेंद्र पवार विधानसभेच्या मैदानात उतरलेत. त्यांनी स्वत: पूर्ण बारामतीमध्ये प्रचार केला. त्याशिवाय सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनीही युगेंद्र पवार यांच्यासह बॅटिंग केली आहे. आता स्वत: शरद पवार अजित पवारांविरोधात मैदानात उतरले आहेत.
राजकीय नेत्यांसोबत असणाऱ्या बॅगेची तपासणी देखील केली जात आहे. राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली. शरद पवार आपल्या होमग्राऊंडवर युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये आले आहेत. शरद पवार हेलिपॅडवर दाखल होताच त्यांच्यासोबत असलेल्या बॅगा आणि साहित्याची निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. यावेळी कपडे, पाणी बॉटल, वर्तमानपत्र आणी महत्त्वाची कागदपत्रे बॅगेत होती.