महाराष्ट्र युवा महोत्सवात बारामती येथील अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास समूह लोकनृत्यांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त
समूह गायनामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. विजेत्या संघांना जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे राष्ट्रीय सेवा योजना व नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, युवाकृती व विज्ञान मेळाव्याचे आयोजन दि. ५ डिसेंबर ते ६ डिसेंबर २०२४ रोजी आझम कॅम्पस येथे करण्यात आले होते.
या महाराष्ट्र युवा महोत्सवात बारामती येथील अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाने समूह लोकनृत्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला व लोकगीत समूह गायनामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. विजेत्या संघांना जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.भीमराव तोरणे, सोमनाथ कदम, सौरभ पांढरे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह(वाघोलीकर), सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी सांस्कृतिक विभागाचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.