बारामतीत भिगवण रोडवर कारचा अपघात, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर
वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
बारामतीत भिगवण रोडवर कारचा अपघात, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर
वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील जैनक वाडी, लामजेवाडी गावाजवळ बारामती येथील रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेतील वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात झाला. चार विद्यार्थी बारामतीहून भिगवन च्या दिशेने टाटा कारमधून निघाले होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चौघे शिकाऊ विमान पायलट हे टाटा हॅरीअर गाडीने बारामतीकडून भिगवणकडे जात होते. गाडी रस्त्याच्या कडेला उलटली आहे. या गाडीतून चौघे जण प्रवास करत होते. यात तिघे तरुण तर एक तरुणी होती. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
अपघात एवढा भीषण झाला की, दोन पायलट जागीच ठार झाले आहेत. तर एकजण गंभीर आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.यामध्ये दक्षू शर्मा (वय 21,वर्षे रा. दिल्ली) आदित्य कणसे (रा. मुंबई) या दोघांचा मृत्यू झाला आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे जैनक वाडी गावामध्ये, लामजेवाडी गावाजवळ बारामती येथे वैमानिक प्रशिक्षण घेणारे चार विद्यार्थी बारामतीहून भिगवनच्या दिशेने चालले होते.
टाटा गाडीतून जात असताना वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. त्यामध्ये दक्षू शर्मा आणि आदित्य कणसे या दोघांचा मृत्यू झाला. तर मुलगी चेष्टा बिश्नोई आणि कृष्णासून सिंग या दोघांवर भिगवण ICU या ठिकाणी उपचार चालू असून मुलीची परिस्थिती गंभीर आहे. याठिकाणी अपघात झाल्याचे समजताच भिगवण पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टॉप, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ, खाजगी ॲम्बुलन्स चालक केतन वाहक यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी भिगवन ICU येथे दाखल करण्यात आले आहे.