सामाजिक बांधिलकीतून गरजुंना ब्लँकेट वाटप
500 ब्लँकेटचे वाटप
बारामती वार्तापत्र
भर थंडीत उबदार ब्लँकेट मिळाल्याने गोर-गरीबांच्या डोळ्यात अश्रू तरळले ते पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. असा गेली 10 वर्ष सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कै.विष्णुपंत पलंगे प्रतिष्ठान व पलंगे पेट्रोलियम बारामती यांच्या वतीने राबविण्यात येणार्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरवर्षी गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर येथे गोर-गरीब लोकांना ब्लँकेटचे वाटप करून मायेची ऊब देण्याचा स्तुत्य उपक्रम याहीवर्षी मोठ्या उत्साहाने राबविण्यात आला. सामाजिक बांधिलकीतून 500 ब्लँकेटचे वाटप यावेळी करण्यात आले.
यावेळी कै.विष्णुपंत पलंगे प्रतिष्ठान व पलंगे पेट्रोलियम बारामतीचे गणेश पलंगे, शैलेश पलंगे, गितेश पलंगे, दिलीप पलंगे उपस्थित होते.