शंभर रो-हाऊसचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या शुभहस्ते उद्घाटन
प्रत्येकी 1 गुंठ्यात रो-हाऊस बांधण्याचा मनोदय केलेला आहे.
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2024/12/IMG-20241214-WA0024-780x450.jpg)
शंभर रो-हाऊसचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या शुभहस्ते उद्घाटन
प्रत्येकी 1 गुंठ्यात रो-हाऊस बांधण्याचा मनोदय केलेला आहे.
बारामती वार्तापत्र
एकता सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., बारामतीच्या अंतर्गत 83 रो-हाऊस व 17 नियोजित असलेल्या 100 रो-हाऊसचे भूमिपूजन समारंभ रविवार दि.15 डिसेंबर 2024 रोजी स.7.30 वा. बारामती-मोरगाव रोड, मेडद, बारामती याठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या शुभहस्ते होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष आलताफ सय्यद यांनी कळविले आहे.
या गृहनिर्माण संस्थेत आर्थिक दुर्बल घटकातील सदस्य आहेत. या सर्व सदस्यांनी एकत्र येण्याचे ठरवून जागा घेऊन त्या जागेवर प्रत्येकी 1 गुंठ्यात रो-हाऊस बांधण्याचा मनोदय केलेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व वेळोवेळी मिळत असलेली खंबीर साथ यामुळे एकता ग्रुपचे प्रगतीपथावर काम सुरू आहे.
आलताफ सय्यद यांची समाजाप्रती असलेले प्रेम, निष्ठा यामुळे 100 कुटुंब एकाच ठिकाणी निवास करणार आहे.
महाराष्ट्रात आदर्श ठरेल अशी गृहनिर्माण संस्था करण्याचा मनोदय आलताफ सय्यद व इतर सदस्यांनी बोलून दाखविलेला आहे. सदरची योजना पूर्ण झालेनंतर येणार्या काळात आणखीन समाजातील लोकांसाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
तरी जास्तीत जास्त समाजातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असेही आवाहन गृहनिर्माण संस्थेचे सचिव परवेज सय्यद व इतर सदस्यांनी केलेले आहे.