शैक्षणिक

विद्या प्रतिष्ठानमध्ये गेम डेव्हलपमेंट इन पायथन या विषयावर व्याख्यान संपन्न

135 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

विद्या प्रतिष्ठानमध्ये गेम डेव्हलपमेंट इन पायथन या विषयावर व्याख्यान संपन्न

बारामती वार्तापत्र

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मधील बी. बी. ए. (सी. ए)विभाग यांनी गेम डेव्हलपमेंट इन पायथन या प्रोग्रामिंग भाषेमधील विषयावर व्याख्यान आयोजित केले होते .

व्याख्यान उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे, उपप्राचार्य लालासाहेब काशीद व्याख्यानाचे मार्गदर्शक विक्रम बलवंत एआय एक्सपर्ट अँड मशिन लर्निग इंजिनिअर उपस्थित होते. बी. बी. ए. (सी. ए.) विभागप्रमुख महेश पवार यांनी आपल्या प्रास्तविकमध्ये व्याख्यानाची उद्दिष्ट व विभागामार्फत भविष्यात विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य आणि ज्ञान वाढवण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली .प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी अशा प्रकारच्या , व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना प्रोग्रॅमिंगच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल व तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये याचा नक्कीच फायदा होईल याबाबत मार्गदर्शन केले.

व्याख्यानाच्या दरम्यान विक्रम बलवंत यांनी पायथन या प्रोग्रामिंग भाषेची ओळख करून दिली, त्यानंतर त्यांची वैशिष्ट्ये आणि व्यावहारिक अनुप्रयोगांचे तपशीलवार स्पष्टीकरण दिले. व्याख्यानामध्ये पायथन मधील प्रमुख वैशिष्ट्ये आणि प्रोग्रामिंग प्रकल्पांमध्ये त्यांचा प्रभावीपणे वापर कसा करायचा इ. संबंधि विविध विषयांचा समावेश केला गेला होता. स्नेक गेम, बुलेट फायर गेम तयार करून मुलांना प्रेरित केले. सदर व्याख्यानास एस वाय आणि टी वाय बी बी ए सीए या वर्गातील 135 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

व्याख्यानाला उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला तसेच विद्यार्थ्यांना ती माहिती नाविन्यपूर्ण वाटली. संगणक शास्त्र विभाग प्रमुख गजानन जोशी, बी.बी.ए.(सी.ए.) विभागप्रमुख महेश पवार, बी.एस.सी.(सी.ए.) विभागप्रमुख किशोर ढाणे एमएससी (सी.एस), समन्वयक डॉ.जगदीश सांगवीकर, प्रा. गौतम कुदळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. व्याख्यानाच्या समन्वयक म्हणून पुनम गुंजवटे यांनी काम पाहिले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी निकम यांनी केले तसेच अक्षय भोसले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. व्याख्यान यशस्वी होण्यासाठी विशाल शिंदे ,अनिल काळोखे , वैशाली पेंढारकर,अक्षय शिंदे, खिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!