दत्त जयंती दिवशी आयुष यास जीवदान
कटफळ ओढ्यात पडलेल्या मुलास बिल्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून जीवदान

दत्त जयंती दिवशी आयुष यास जीवदान
कटफळ ओढ्यात पडलेल्या मुलास बिल्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून जीवदान
बारामती वार्तापत्र
रविवार १५ डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्त दत्त मंदिरात दर्शन साठी जात असताना आयुष गणेश झगडे ( वय वर्ष ७) हा कटफळ मधील मोरे वस्ती नजीक असलेल्या २० फूट खोल औढ्यात साईकलवरून जात असताना तोल जाऊन पडला व पोहता येत नसल्याने गटांगळ्या खाऊ लागला व सहकारी मित्र वाचवा म्हणून ओरडू लागले त्या बाजूने भाऊसाहेब मोरे ( बिल्ट ग्राफिक्स कंपनी भिगवन) हे कंपनीत दुपार शिप साठी दुचाकी वरून निघाले असताना त्यांनी आवाज ऐकून दुचाकी थांबवुन औढ्यात उडी मारून आयुष झगडे यास खोल पाण्यातून बाजूला काढले व शरीरात गेलेले पाणी छाती दाबून बाहेर काढले व जीवदान दिले.
त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रथम उपचार करण्यासाठी रुग्णालय मध्ये नेण्यात आले व व प्रकृती धोक्याच्या बाहेर असलेले डॉक्टरांनी सांगितले त्यामुळे भाऊसाहेब मोरे यांच्या रूपामध्ये आयुष्याला जीवदान प्राप्त झालेले आहे. आयुष झगडे हा जेनेबिया इंग्लिश मीडियम स्कूल कटफळ या ठिकाणी इयत्ता दुसरी मध्ये शिकत आहे त्याच्या आई-वडिलांनी भाऊसाहेब मोरे यांचे आभार व्यक्त केले.
मला आवाज आल्याने मी वाचवू शकलो पण जर आवाज नसता दिला किंवा उशीर झाला असता तर अनर्थ घडवू शकला असता .प्रत्येक लहान मुलांना पोहण्याचे प्रशिक्षण द्या. दत्त महाराजांनी प्रेरणा दिल्याने वाचवू शकलो असल्याचे भाऊसाहेब मोरे यांनी सांगितले.
चौकट:
कटफळ गावातील मोरे वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यावर एका बाजूला विहीर व दुसऱ्या बाजूला ओढा आहे त्यामुळे त्या रस्त्यावरून जाणाऱ्यांचे या पूर्वी अपघात झाले आहेत वर्दळ वाढल्याने व रात्रीच्या अंधारात अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे किंवा ग्रील बसवावे अशी मागणी कटफळ मधील ग्रामस्थ करीत आहेत.