राज्यस्तरीय महाराष्ट्र युवा महोत्सव २०२४ मध्ये तुळजाराम चतुरचंद महाविदयालयातील सांस्कृतिक विभागास सामूहिक लोकनृत्यामध्ये बोलबाला
स्पर्धेसाठी राज्यभरातून ४५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला
राज्यस्तरीय महाराष्ट्र युवा महोत्सव २०२४ मध्ये तुळजाराम चतुरचंद महाविदयालयातील सांस्कृतिक विभागास सामूहिक लोकनृत्यामध्ये बोलबाला
स्पर्धेसाठी राज्यभरातून ४५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला
बारामती वार्तापत्र
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यांनी नांदेड येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विभागीय महाराष्ट्र युवा महोत्सव २०२४ मध्ये तुळजाराम चतुरचंद महाविदयालयातील सांस्कृतिक विभागाने सामूहिक लोकनृत्यामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्यातून प्रथम तसेच सोलापूर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये पुणे विभागामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आठ विभागातून पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करीत ३६ जिल्ह्यांमधून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
नांदेड येथे लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, कथालेखन, वक्तृत्व, विज्ञान व तंत्रज्ञान आणि कविता लेखन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी राज्यभरातून ४५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.भीमराव तोरणे, प्रा.राजेंद्र कंडरे, सोमनाथ कदम, प्रयाग खुळे यांचे संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांचे वतीने हार्दिक अभिनंदन केले आहे.