पोदार इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांच्या सादरीकरणाने
पोदार इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांच्या सादरीकरणाने
बारामती वार्तापत्र
बारामती येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम १८ डिसेंबर रोजी
ग.दि.मा सभागृहात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांच्या सादरीकरणाने उत्साहात संपन्न झाला.
पुणे बारामती ग्रामीण विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागातील इतर पोदार शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक पालक समितीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पेनवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी पोदार इंटरनॅशनल स्कूलने ‘ विक्रम आणि वेताळ ’ व पोदार प्रेप ने ‘कहानी और कला का उत्सव जम्बो के संग ‘ या संकल्पनेवर आधारित अभिनय नाटक , समूह गायन व विविध गीत नृत्यांचा कार्यक्रम सादर केला.
शाळेचे प्राचार्य तुषार कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात शाळेत राबविल्या जाणाऱ्या सहशालेय उपक्रमाचा परिचय ध्वनिचित्रफितीद्वारे करून देत शाळेचा विकास व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आढावा सादर घेतला. तसेच पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सरिता परकाळे यांनी पोदार प्रेप मध्ये वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या वर्षाच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे आर्टीफिसिअल इंटेलिजन्स व डिजिटल प्रक्रियाद्वारे शाळेतील शिक्षकांनी ऑडिओ , व्हिडिओ व पीपीटीचे केलेले सादरीकरण लक्षवेधक ठरले.
कार्यक्रमामध्ये अभिनयाद्वारे सादर केलेले ‘ विक्रम आणि वेताळ’ नाटक व विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषेत सादर केलेला कलाविष्कार पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले.
प्राचार्य तुषार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सरिता परकाळे , समन्वयक माधुरी क्षीरसागर ,तुषार चव्हाण , मंगेश महामुनी , सोनाली काळे , शालेय प्रशासकीय प्रमुख शेखर तुपे, सांस्कृतिक विभाग प्रमुख बालाजी घोळवे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी केलेल्या सहकार्याबद्दल प्राचार्य तुषार कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्रेसी दिवेकर , ललिता पालीवाल व विद्यार्थी प्रतिनिधी कौस्तुभ राऊत, आर्या दोभाडा , समृद्धी कुंभार , अवनी काटे देशमुख , गौरी मलगुंडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार आलिया शेख यांनी मानले.