इंदापूर महाविद्यालयात जागतिक ध्यान दिवस साजरा
ध्यानधारणा व योगाचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले..
इंदापूर महाविद्यालयात जागतिक ध्यान दिवस साजरा
ध्यानधारणा व योगाचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले..
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांच्या प्रेरणेतून कनिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून (दि.21) डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना ध्यान व योगाचे आपल्या जीवनात असलेले महत्त्व मान्यवरांनी सांगितले तसेच यावेळी ध्यानधारणा व योगाचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. गोळे डी. के., पतंजली योगसमितीचे मल्हारी घाडगे, प्रशांत गिड्डे, जितेंद्र माने, संजय मोरे उपस्थित होते.योगशिक्षक जितेंद्र माने यांनी पूर्वीचे ऋषीमुनीं यांची ध्यानमग्न जीवनशैली समजावून सांगितली आणि विद्यार्थी जीवनात सकस आहार, व्यायाम आणि ध्यान याचे महत्त्व पटवून दिले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य गोळे डी. के. यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये आजच्या धावपळीच्या जीवनात वाढणारा ताण , तणाव चिंता यावर ध्यानाने कशाप्रकारे प्रभावी मार्ग काढता येतो हे सांगितले आणि ध्यानाचे महत्त्व सांगितले.
योगशिक्षक मल्हारी घाडगे यांनी निरोगी जीवनासाठी हास्ययोग करवुन घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सागर गुजराथी यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. सुवर्णा जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. धन्यकुमार माने यांनी मानले.