शैक्षणिक

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील दोन प्रकल्पांची आविष्कारराज्यस्तरीय निवड

सहा प्रकल्पांमधून दोन प्रकल्पांची निवड

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील दोन प्रकल्पांची आविष्कारराज्यस्तरीय निवड

सहा प्रकल्पांमधून दोन प्रकल्पांची निवड

बारामती वार्तापत्र 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धेत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या दोन संशोधनाची विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेतून निवड झाली आहे.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धा विद्यापीठामध्ये घेण्यात आली होती.

या स्पर्धेत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील वेगवेगळ्या संशोधन प्रकारांमध्ये सहा संशोधन प्रकल्पांची निवड करण्यात आली होती. या सहा प्रकल्पांमधून दोन प्रकल्पांची निवड राज्यस्तरीय पातळीवर करण्यात आली.

यासाठी महाविद्यालयाचे विक्रम पाटील पीएचडी वनस्पतीशास्त्र संशोधक विद्यार्थी याने ‘ शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणारे झाड’ या वर संशोधन केले तर प्राणिशास्त्र विभागातील खुशबू ओसवाल हिने सादर केलेल्या ‘ऍडवान्सड प्रोग्रेस इन सिल्क फायब्रॉनिन अँड सेरीसीन’ या प्रकल्पांची राज्यपातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली.

याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, आविष्कार प्रमुख डॉ. श्रीकृष्ण साळुंके यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button