तुमचे ज्ञान हे समाजपयोगी असले पाहिजे: डॉ विलास कर्डीले
विद्यार्थ्यांनी शिबीरामध्ये आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी कसा फायदेशीर होईल याचा विचार करावा.

तुमचे ज्ञान हे समाजपयोगी असले पाहिजे: डॉ विलास कर्डीले
विद्यार्थ्यांनी शिबीरामध्ये आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी कसा फायदेशीर होईल याचा विचार करावा.
बारामती वार्तापत्र
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विद्या प्रतिष्ठानचे कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय बारामती यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष श्रम संस्कार शिबिर मौजे सावळ येथे आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गिताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अनंत शेरखाने यांनी केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी लाभलेले प्रमुख पाहुणे डॉ विलास कर्डीले यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे काय ति कधी सुरू झाली त्याचे महत्त्व आतपर्यंत किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे या विषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी शिबीरामध्ये आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी कसा फायदेशीर होईल याचा विचार करावा.विद्यारथ्यानी गावात किती पाऊस पडतो, शेतकरी कुठले पिके घेतात,खते कीडनाशके वापरतात कुठली झाडे आहेत देशी विदेशी किती आहे, ते ऑक्सीजन किती देतात याविषयी माहिती सर्वे करून काढावी असे सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सुमन देवरुमठ, ग्राम पंचायत सदस्य श्री अशोक काशिद, श्री गणेश विरकर, ग्रामस्थ व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु ऋतुजा नेहारकर तर आभार कु सिद्दी कापसे हिने केले.