जिद्द आणि मेहनत या दोन गोष्टी
आपले यश ठरवत असतात-डॉ. महेश देशपांडे
करियर मार्गदर्शन
बारामती वार्तापत्र
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड कॉम्प्युटर एज्युकेशन माळेगाव (बु.) या महाविद्यालयातील संगणक विभागातर्फे तृतीय वर्षीय संगणक विभागातील विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन नुकतेच पार पडले या साठी कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स वाकड या कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेश देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
पदवी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त संगणक विभागातील इतर सर्टिफिकेट कोर्सची माहिती याबद्दल ही मार्गदर्शन केले तसेच उपप्राचार्य सोनवणे सर यांनीही मार्गदर्शन केले .
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित चांदगुडे सर, विभाग प्रमुख प्रा. सचिन सस्ते प्रा. प्रमोद तावरे उपस्थित होते, या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. संतोषी पवार यांनी केले होते.