माळेगाव बु
जागतिक युवा दिनी बारामती तालुक्यातील माळेगाव बु. येथे उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन
आवाहन प्र. प्राचार्य अवधूत जाधवर यांनी केले
जागतिक युवा दिनी बारामती तालुक्यातील माळेगाव बु. येथे उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन
आवाहन प्र. प्राचार्य अवधूत जाधवर यांनी केले
बारामती वार्तापत्र
जागतिक युवा दिनानिमित्त अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव बु. येथे १२ जानेवारी रोजी उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
यापूर्वी या संस्थेत प्रशिक्षण पूर्ण करुन संबंधित क्षेत्रातील कार्यरत असलेले यशस्वी उद्योजक तसेच विविध पदावर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहेत.
प्रशिक्षणार्थ्यांकरीता यशस्वी उद्योजकांचे, मानसोपचार तज्ज्ञ, स्वामी विवेकानंद यांच्याविषयी मार्गदर्शन तसेच तंत्र प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात येणार आहे.
उद्योजक तसेच माजी विद्यार्थ्यांनी गटनिदेशक सपकळ संपर्क क्र. ९९६०५९१३४८ यांच्याशी सपंर्क साधावा, असे आवाहन प्र. प्राचार्य अवधूत जाधवर यांनी केले आहे.