उप प्रादेशिक कार्यालयामार्फत बारामती, इंदापूर व दौंड तालुक्यात रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती
वाहतुकीच्या नियमाबद्दल महिती
उप प्रादेशिक कार्यालयामार्फत बारामती, इंदापूर व दौंड तालुक्यात रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती
वाहतुकीच्या नियमाबद्दल महिती
बारामती वार्तापत्र
उप प्रादेशिक कार्यालयामार्फत आयोजित ‘बारामती रस्ता सुरक्षा अभियान-२०२५’ अंतर्गत बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यात रस्ते सुरक्षाबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली.
इंदापूर बसस्थानक येथे प्रवाशी, बसचालकांना रस्ता सुरक्षा नियम तसेच बसमधून प्रवास करतांना घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बसस्थानका बाहेर रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली.दौंड येथे अनुज्ञप्ती चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये रस्ता सुरक्षानियमाविषयक जनजागृती करण्यात आली.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती व इंदापूर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर येथे विद्यार्थ्याना रस्ता सुरक्षा अभियनांतर्गत वाहतुकीचे नियम तसेच अपघाताची प्रमुख कारणे आणि सुरक्षात्मक उपाययोजनांबाबत प्रबोधन करण्यात आले. अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूलयेथे ‘रस्ता सुरक्षा काळाची गरज’ या विषयी मार्गदर्शन करून रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा घेण्यात आली. डॉ.हर्षल राठी डोळ्यांचा दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने खाजगी प्रवासी, शाळा बस चालकांचे नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.
विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा बारामती येथे शालेय विद्यार्थ्याना रस्त्यावर चालतांना घ्यावयाची काळजी, वाहतुकीच्या नियमाबद्दल महिती देण्यात आली.
कै. ग.भि देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बारामती येथे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजित करण्यात आले.
रयत शिक्षण संस्था आर एन अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्यूनियर कॉलेज बारामती येथे शालेय विद्यार्थ्यासाठी ‘वॉक ऑन राईट’ मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा विषयक नियमांची माहिती देवून माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले.