बारामती गुन्हेगारीला आवर कधी?दुप्पट परताव्याचं आमिष दाखवत पाच लाखांना घातला गंडा;पती-पत्नीसह चौघांवर गुन्हादाखल
५ ते १० टक्के परतावा देत असल्याचं सांगून
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2025/01/image_search_1736434617460-780x470.webp)
बारामती गुन्हेगारीला आवर कधी?दुप्पट परताव्याचं आमिष दाखवत पाच लाखांना घातला गंडा;पती-पत्नीसह चौघांवर गुन्हादाखल
५ ते १० टक्के परतावा देत असल्याचं सांगून
बारामती वार्तापत्र
व्यापारदृष्ट्या महत्त्वाच्या शहरापैकी एक असलेल्या बारामती परिसरात काही महिन्यांपासून क्राईम रेट वाढला आहे. खूनी हल्ले, चोऱ्या, घरफोड्या, जबरी चोऱ्या यासोबतच मारहाण होण्याचे प्रकार वाढल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
दुचाकीच्या चोऱ्यांमध्ये कमालीची वाढ झाली असुन पोलिसांचा धाक गुन्हेगारांना उरला नसल्याचे दिसत आहे. अवैध व्यवसाय फोफावत असून तरुणाई नशेच्या विळख्यात अडकली आहे. ही परिस्थिती पोलिसांसमोर आव्हान निर्माण करणारी आहे.
रियल इस्टेट कंपनीत गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवत ५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार बारामतीत घडला आहे.
या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात पती-पत्नीसह चौघांवर गुन्हादाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आमच्या कंपनीत मोठेमोठे राजकीय नेते आणि उद्योगपती आहेत, आमच्या नादाला लागू नकोस नाहीतर जीवाला मुकशील असं म्हणत गुंतवलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याचंही समोर आलं आहे.
याबाबत विजय कुलकर्णी (रा. खंडोबानगर, बारामती) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मदन जहांगीर
पाडवी, वंदना पाडवी (दोघेही रा. अशोकनगर, बारामती), सचिन डोंगरे आणि विकास निकम या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विजय कुलकर्णी यांची मदन पाडवी याच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी त्याने आपली मोठी कंपनी असून रियल इस्टेटमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतो, या कंपनीची दिल्ली आणि मुंबईत कार्यालये आहेत असं सांगितलं.
तसेच या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना दरमहा ५ ते १० टक्के परतावा देत असल्याचं सांगून १ ते ५ लाख रुपये गुंतवल्यानंतर मिळणाऱ्या नफ्याबद्दल माहिती दिली. त्यावेळी कुलकर्णी यांनी विचार करून कळवतो उत्तर दिलं.
त्यानंतर काही दिवसांनी मदन पाडवी व त्याची पत्नी कुलकर्णी यांच्या घरी गेले. त्यांनी वर्षात दुप्पट पैसे देण्याचं आमिष दाखवलं. तसेच सचिन डोंगरे आणि विकास निकम या दोघांना फोन लावून बोलणंही करून दिलं.
त्यामुळं कुलकर्णी यांनी आपली एफडी मोडून मदन पाडवी याच्या खात्यात ५ लाख रुपये जमा केले. दरम्यान काही महिन्यांनंतर कुलकर्णी यांनी परताव्याची रक्कम मागण्यासाठी मदन पाडवी याला संपर्क साधला. मात्र त्याच्याकडून टाळाटाळ होवू लागली.
त्यामुळं कुलकर्णी यांनी वंदना पाडवी, सचिन
डोंगरे आणि विकास निकम यांना संपर्क संपर्क साधला. मात्र त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी कुलकर्णी यांनी मदन पाडवी याच्या घरी जाऊन गुंतवणुकीच्या पैशांबद्दल चौकशी केली. त्यावेळी पाडवी याने कंपनला तांत्रिक अडचण आली असून काही दिवस थांबण्यास सांगितलं.
काही दिवसांनी परताव्याची मागणी केल्यानंतर पाडवी याने स्पष्टपणे नकार दिला. आमच्या कंपनीत मोठेमोठे राजकीय नेते आणि उद्योगपती आहेत, आमच्या नादाला लागू नकोस नाहीतर जीवाला मुकशील असं
धमकावत गुंतवलेली रक्कम देण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानुसार बारामती शहर पोलिस ठाण्यात मदन
पाडवी, वंदना पाडवी, सचिन डोंगरे आणि विकास निकम या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.