पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात साजरा
विविध प्रात्यक्षिके सादर

पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात साजरा
विविध प्रात्यक्षिके सादर
बारामती वार्तापत्र
बारामतीतील बांदलवाडी येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवाची सांगता १८ जानेवारी रोजी शाळेच्या क्रीडांगणावरती मोठया जल्लोषात झाली.
शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी या उद्देशाने दर वर्षी साजरा केला जाणारा वार्षिक क्रीडा महोत्सव शाळेच्या मैदानावर उत्साहात पार पडला.
क्रीडा महोत्सवाची क्रीडाज्योत तालुका क्रीडा अधिकारी श्री. महेश चावले यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. यावेळी ॲक्वा , इग्निस , टेरा , वेंटस हाऊसच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेड करून क्रीडाशपथ घेतली.
या उत्सवात पूर्वप्राथमिक , प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक व सामूहिक खेळांच्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ॲक्वा , इग्निस , टेरा , वेंटस हाऊसमधील माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी हॉलीबॉल , बॅडमिंटन , कबड्डी , बास्केटबॉल , खो – खो ,रिले , फुटबॉल , धावणे , तर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ , कॅरम , ५० , १०० मि. धावणे , रिंगगेम इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी संगीतावर ॲरोबिक्स ,योगा यांची विविध प्रात्यक्षिके सादर केली.
या वर्षाचा वार्षिक क्रीडाचषक इग्निस हाऊसने पटकावला. विजेता हाऊस व विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते क्रीडाचषक , पदक ,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पालकांसाठी आयोजित केलेल्या लेझीमशर्यत , लिंबु-चमचा , अडथळ्यांची शर्यत या स्पर्धेमध्ये पालकांनी उत्साहात सहभाग घेतला होता.
आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी क्रीडा संस्कृती जोपासणे आवश्यक असल्याचे तालुका क्रीडा अधिकारी श्री. महेश चावले यांनी सांगितले.
शाळेचे प्राचार्य तुषार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक जयदीप भोसले व चंदाराणी शिंदे यांनी क्रीडा स्पर्धेचे नियोजन केले होते.
समन्वयक माधुरी क्षीरसागर , तुषार चव्हाण , मंगेश महामुनी , सोनाली काळे , शालेय प्रशासकीय प्रमुख शेखर तुपे , पूर्व प्राथमिक विभागप्रमुख सरिता परकाळे यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी घोळवे , सुप्रिया देवकाते यांनी केले.शर्मिला यादव यांनी आभार मानले.