पवार साहेबांच्या नावाने खाजगी रूग्णालयात लूट? बॉन्सर रूग्णांना उचलायला की, भिती दाखवायला? या रूग्णालयाचा सावळा गोंधळ!
बॉन्सर रूग्णांना उचलण्यासाठी की भिती दाखवण्यासाठी

पवार साहेबांच्या नावाने खाजगी रूग्णालयात लूट? बॉन्सर रूग्णांना उचलायला की, भिती दाखवायला? या रूग्णालयाचा सावळा गोंधळ!
एकाला एक न्याय दुसर्या दुसरा न्याय
बारामती वार्तापत्र
एकाच छत्राखाली सर्व सुविधा या मथळ्याखाली अत्याधुनिक कमी कालावधीत बारामतीच्या आसपासच्या तालुक्यात कमी वेळात नामांकित रूग्णालयात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांचे नाव वापरून रूग्णांची लूट केली जात आहे. या रूग्णालयात बॉन्सर रूग्णांना उचलण्यासाठी की भिती दाखवण्यासाठी हेच अद्याप कळाले नाही.
या रूग्णालयाचा सावळा गोंधळ लवकरच चव्हाट्यावर आल्याशिवाय राहणार नाही.या रूग्णालयात मोफत हृदयरोग तपासणी शिबीर व ऍन्जीओग्राफी, ऍन्जोप्लास्टी साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन करण्यात येईल अशी जाहिरात हे रूग्णालय करीत आहे. मात्र पिडीत रूग्ण याठिकाणी गेल्यानंतर भलतंच ऐकावयास मिळत आहे.
हडपसर येथील जावई सासर्याच्या घरी भेटावयास आले असता, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना या नामांकित रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी ऍन्जीग्राफी केलेनंतर ऍन्जोप्लास्टी करावी लागेल असे सांगितलेनंतर तातडीने सासरकडच्या लोकांनी या रूग्णालयात उपचारास सुरूवात केली. नामांकित व सर्वसोयीयुक्त रूग्णालय असल्याने पर्याय नव्हता.
रूग्णाला रूग्णालयात प्रवेश करते समयी प्रवेशद्वारावर जसे की यमराज (बॉन्सर) उभे आहेत. त्यांना पाहताच रूग्णाला व रूग्णाच्या नातेवाईकांना मनात धडकी भरली आधीच भावनिक झालेले त्यामध्ये या यमराजांना पाहून आणखीन भावनिक झाले. रूग्णाला तातडीने दाखल करण्यासाठी व्हीलचेअर आणायची कोणी हा येथील कर्मचार्यांना पडलेला प्रश्र्न होता.
रूग्णाला लवकर रूग्णालयात प्रवेश करण्यास व्हीलचेअर उपलब्ध असताना उपलब्ध झाली नाही. उलट रूग्ण स्वत: गाडीतून बाहेर येऊन रूग्णात प्रवेश केला.
एवढ्यावरच न थांबता पुढचा रूग्ण हक्काचा भंग कसे रूग्णालय करतो हे दिसून आले. संबंधित डॉक्टरांनी रूग्णाची फाईल मागितली त्यामध्ये रूग्णाला यापुर्वी सुरू असलेले उपचार पाहिल्यानंतर, रूग्णाच्या नातेवाईकास अकौंट विभागाची संपर्क व चर्चा करण्यास सांगण्यात आले.
चर्चा करणे राहिले दूर येथील कर्मचारी चार दिवस झोपला नसल्यासारखे कंटाळा देताना दिसून आला. त्याने मजुरीवर काम करायचे त्याप्रमाणे माहिती सांगा मी ऐकतो, सर्व हकीकत सांगितल्यावर तुम्हाला तात्काळ दहा हजार रूपये भरावयास लागतील. रूग्णांचे नातेवाईक रूग्णाची परिस्थिती पाहुन भयभीत झालेले होते त्यामध्ये पैश्याची मागणी केली. त्यावर नातेवाईक म्हणाले पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शस्त्रक्रिया आहे ना? तीन हजार रूपयांमध्ये शस्त्रक्रिया केली जाते असे सांगण्यात आले.
येथील कंटाळवाना कर्मचार्याने कानाला फोन लावला आणि ही योजना अतितातडीच्या रूग्णाला लागू होत नाही असे सांगितले. एकाला एक न्याय दुसर्या दुसरा न्याय या बोलण्यावर नातेवाईकांचा पारा चढला.
मोफत शस्त्रक्रियेच्या बोर्डवर 9 ते 6 वेळ दिलेला असताना रूग्णास साडे पाचला आणलेले असताना सुद्धा रूग्णाला वेळेत आणले नाही असे येथील कर्मचारी सांगत होते. रूग्णाचे सर्वेसर्वा नुसतंच गोडबोले यांना याबाबत कल्पना दिली असता, मी सांगतो, तुम्ही काळजी करू नका मात्र, या महाशयांनी काहीही सांगितले नाही. हा सर्व गोंधळ पाहून रूग्णाच्या नातेवाईकांनी प्रथम उपचार सुरू करा आपण काय आहे ते नंतर पाहू.
मात्र तेथील असणारे कर्मचारी काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. लवकर घरी काम असेल असे वाटत होते. शेवटी यांनी फाईल बाजुला ठेवली. रूग्णाची ऍन्जीग्राफी केली पैश्याचा विषय असल्याने दुसर्या दिवशी ऍन्जीओप्लास्टी करण्यात आली. या दोन्ही शस्त्रक्रिया एकाच वेळी केल्या असत्या तर एकाच ठिकाणी दोन शस्त्रक्रिया झाल्या असत्या मात्र, पैश्याचा विषय असल्याने एका दिवशी ऍन्जीओग्राफी दुसर्या दिवशी प्लास्टी करण्यात आली. पण फाईल पाहणारे कर्मचारी वैतागलेले असल्याने ते नातेवाईकांनी नीट बोलत नव्हते तुम्हाला काय करायचे ते करा माझ्याशी बोलू नका असे सांगितले.
डॉक्टरांना रूग्णाकडे इन्श्युरन्स असल्याचे कळताच लगेच दुसर्या दिवशी शस्त्रक्रिया केली. नातेवाईकांची पळापळ पाहता यमराज (बॉन्सर) इकडे तिकडे पळू नका एका ठिकाणी बसा अशी उर्मट व उद्धटपणे बोलून वागणूक देवून रूग्णाला व नातेवाईकांना अपमानीत सुद्धा केले असल्याचे त्रस्त नातेवाईकांनी आमच्याशी बोलताना सांगितले.
उपमुख्यमंत्र्याच्या गावात खाजगी रूग्णालयाचा मनमानी व फसवणूक करण्याचा कारभार कधी थांबणार असा सवाल स्थानिक नागरिकांसह हडपसर येथील रूग्णाला व रूग्णांच्या नातेवाईकांना पडलेला आहे.
बारामतीत शासकीय सिल्व्हर ज्युबिली रूग्णालय, महिला हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, रुई हॉस्पिटल यामध्ये असणारा अपुरा कर्मचारी वर्ग, वेळेचा अभाव यामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे त्यामुळे 24 तास रूग्णालय सुरू ठेवण्याची मागणी होत आहे. बारामतीचे नामांकित रूग्णालय कोणत्या तरी मोठ्या रूग्णालयास चालविण्यास देण्याची गरज या रूग्णालयाच्या काही संचालकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता. याकडे उपमुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे अशी समस्त बारामतीकरांचे म्हणणे आहे.