शैक्षणिक

विद्या प्रतिष्ठानचे कमलन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी वकृत्व स्पर्धांचे आयोजन

राष्ट्र उभारणीत तरुणांची भूमिका

विद्या प्रतिष्ठानचे कमलन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी वकृत्व स्पर्धांचे आयोजन

राष्ट्र उभारणीत तरुणांची भूमिका

बारामती वार्तापत्र 

विद्या प्रतिष्ठानचे कमलन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत १६ जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे विभाग प्रमुख डॉ. नागेश सूर्यवंशी, सांस्कृतिक अधिकारी प्रा. पल्लवी बोके, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब पाटील, डीन ऑटोनॉमी डॉ. चित्तरंजन नायक, प्रा. दिपक सोनवणे, प्रा. हनुमंत बोराटे आदी मान्यवर प्राध्यापकांचे उपस्थितीत पार पडले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची विद्यार्थिनी सानिका कदम हिने केले.

तसेच स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची विद्यार्थिनी साक्षी ढेकळे हिने स्वामी विवेकानंद यांची माहिती सांगितली. महाविद्यालयातील वेगवेगळ्या विद्याशाखांमार्फत एकूण दहा विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता.

राष्ट्र उभारणीत तरुणांची भूमिका, “सामाजिक बदलाचे उत्प्रेरक म्हणून युवक” स्वामी विवेकानंदांची शिकवण: आजच्या तरुणांसाठी मार्गदर्शक हे विषय वक्तृत्व स्पर्धेसाठी देण्यात आले होते. या स्पर्धेसाठी प्रमुख परीक्षक म्हणून महाविद्यालयातील डॉ. विनोद तोडकरी, प्रा. हनुमंत बोराटे तसेच रुपाली देवकाते यांनी काम पाहिले.

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- राधिका आखरे तृतीय वर्ष संगणक शाखा, द्वितीय क्रमांक- जानवी घोरपडे द्वितीय वर्ष संगणक शाखा, तृतीय क्रमांक- प्रियेश चौगुले तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखा. या यशस्वी स्पर्धकांना सन्मानचिन्ह प्रशस्ति पत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पारपडल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!