उद्योगास चालना, शिक्षणात आमूलाग्र बदल, यासाठी दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक बैठक प्रेरणादायी, अंकिता पाटील ठाकरे यांचे मतं
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार
उद्योगास चालना, शिक्षणात आमूलाग्र बदल, यासाठी दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक बैठक प्रेरणादायी, अंकिता पाटील ठाकरे यांचे मतं
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार
इंदापूर प्रतिनिधी –
स्वित्झर्लंड येथील दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीसाठी एस. बी पाटील शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी उपस्थिती लावली आहे. या परिषदेसाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीला सुरुवात झाली आहे. या परिषदेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निहार ठाकरे देखील उपस्थित आहेत.
यावेळी अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या, या परिषदेत जागतिक व्यापार, व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून जगाच्या आणि एखाद्या प्रदेशाच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने चर्चा झाली.
यावेळी त्यांनी आपल्या देशातील उद्योग, शिक्षण, आदी विषयांवर मतं मांडले. या परिषदेसाठी मला निमंत्रित करण्यात आले, ही एक मोठी जबाबदारी असून आपल्या देशाच्या वतीने याठिकाणी महत्वाचे प्रश्न मांडले. या परिषदेच्या माध्यमातून आपल्या देशात गुंतवणूक वाढावी, तसेच शिक्षण, व्यापार आदी क्षेत्रात अजून सुधारणा व्हावी, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
या परिषदेत पहिल्याच दिवशी (२१ जानेवारी) महाराष्ट्राने मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे.