“प्रियदर्शिनी”चे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश
स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण, 1 रौप्य, 3 कांस्य अशी 6 पदके व सांघिक विजेतेपदाचा मिळवला चषक
“प्रियदर्शिनी”चे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश
स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण, 1 रौप्य, 3 कांस्य अशी 6 पदके व सांघिक विजेतेपदाचा मिळवला चषक
इंदापूर प्रतिनिधी –
जत (सांगोला) येथे झालेल्या शोतोकन कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडियाच्या तिसऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश मिळवत प्रियदर्शिनी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण, 1 रौप्य, 3 कांस्य, अशी 6 पदके व सांघिक विजेतेपदाचा चषक मिळवला.
या स्पर्धेत स्वराली शेंडे, प्रणिती आदलिंगे यांनी सुवर्णपदके, परिशिष्टा धायगुडे हिने रौप्यपदक तर फैजशिकलकर, शिवतेज अनभुले, अरहान शेख यांनी कांस्यपदके मिळवली. त्यांना क्रीडाशिक्षक सचिन केंगार यांचे मार्गदर्शक लाभले. प्रियदर्शिनी इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष पी. जी. नायर, उपाध्यक्ष इम्रान शेख, प्राचार्या तस्लीम शेख, गौस शेख यांनी यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन केले आहे.