शैक्षणिक

प्रश्नमंजुषा स्पर्धेत पुणे विभागात टेक्निकल विद्यालयाचा प्रथम क्रमांक

42 शाळांनी सहभाग घेतलेला होता.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत पुणे विभागात टेक्निकल विद्यालयाचा प्रथम क्रमांक

42 शाळांनी सहभाग घेतलेला होता.

बारामती वार्तापत्र

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधीनी व पश्चिम विभाग, पुणे यांच्या तर्फे प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन पुणे या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेत विभागातील 42 शाळांनी सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या आर.एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल ने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे .वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये विविध विषयावर आधारित प्रश्नांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता.

या स्पर्धेत विद्यालयातील प्रणव निकम , प्रजेश नेहरे, कु. सिद्धी खराडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता .या निमित्ताने प्रश्नमंजुषा विभाग प्रमुख सौ.नाझनीन शेख व विजेत्या विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य श्री. कल्याण देवडे, स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष सदाशिव बापू सातव यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!