बारामतीकरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ‘आर्सेनिक 30’ गोळ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाटप…
आज प्रातिनिधिक स्वरूपात पाच कुटूंबांना केले...
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2020/06/7eea78f4-0618-4e78-8562-a45b5b8d8108-780x470.jpg)
बारामतीकरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ‘आर्सेनिक 30’ गोळ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाटप…
आज प्रातिनिधिक स्वरूपात पाच कुटूंबांना केले…
बारामती, दि. 20 : ‘कोरोना’ विरुद्धच्या लढ्यात बारामतीकरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ‘आर्सेनिक 30’ या होमिओपॅथी औषधांचा ‘बूस्टर डोस’ बारामतीकरांना देण्यात येणार आहे.
बारामतीमध्ये 1 लाख कुटुंबांना गोळ्यांच्या डब्यांचे वाटप करण्यात येणार असून बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्याकडे औषधांच्या 60 हजार डब्या सुपूर्द करण्यात आल्या. आरोग्य विभागामार्फत या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आल्या होत्या, त्याचेच प्रातिनिधिक स्वरूपात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभारंभ केला आहे.
यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, पुणे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते , उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील आदी उपस्थित होते.
मुंबई येथील रहिवासी आशिष पोतदार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र पाठवत या ‘आर्सेनिक 30’ होमिओपॅथी औषधाच्या 1 लाख डब्या उपलब्ध करुन देण्याची तयारी दाखवली होती.
त्यानुसार या 60 हजार औषधांच्या डब्या देण्यात आल्या आहेत, त्याचाच शुभारंभ आज अजित पवार यानी केला.