इंदापूरात दुचाकी चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ
पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करण्याची मागणी..
इंदापूरात दुचाकी चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ
पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करण्याची मागणी..
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूरातील शहर व परिसरातील गावांमध्ये दुचाकी चोऱ्या होण्याच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. मागील 2 दिवसांत इंदापूर शहरातून 4 दुचाकी चोरी झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. याप्रकरणी इंदापूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करण्याची मागणी इंदापूरकरांकडून होत आहे.
याबाबत तुषार प्रकाश उबाळे (वय 42वर्षे , व्यवसाय नोकरी, रा. भैरवनाथ नगर पडस्थळ रोड, इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी (दि.31) रात्री राहत्या घराच्यासमोरील मोकळ्या जागेतून 35 हजार रुपये किमतीची मोटारसायकल तसेच फिर्यादीच्या घराचे शेजारी राहणारे बापू बबन गायकवाड यांचीही सुमारे 20 हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यासह महेश काशिनाथ पाटील (वय 45, व्यवसाय नोकरी, रा. कर्मयोगी साखर कारखाना कॉलनी बिजवडी, ता.इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी (दि.29) पाचच्या दरम्यान बिजवडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत आठवडा बाजाराजवळील अंगणवाडीचे समोरील मोकळ्या जागेत फिर्यादीने 15 हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरून नेली यावरून गुन्हा दाखल केला आहे. तर अन्य एका चोरीच्या घटनेत सुरेश चंद्रकांत शिर्के (वय 43, व्यवसाय नोकरी, रा. सावतामाळीनगर, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी
फिर्यादीच्या राहत्या घराच्यासमोरील मोकळ्या जागेत लावलेली सुमारे 25 हजार रुपये किमतीची मोटारसायकल ही अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणी ही इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यासह अन्य तीन-चार मोटरसायकल ही चोरीला गेल्याची माहितीसमोर येत आहे. संबंधितांकडे पूर्ण कागदपत्रे नसल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार देण्यास टाळाटाळ केल्याचे बोलले जात आहे. यामुळे इंदापूर शहर तसेच परिसरात दुचाकी चोरीच्या वाढलेल्या घटनांबाबत पोलिसांनी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.